सोशल मीडियावर आजच्या काळात काहीही व्हायरल होऊ शकतं. क्रीएटीव्ह युजर्स वेगवेगळे मीम्स आणि पोस्टच्या माध्यमातून लोकांना विनोदाचे डोस देण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर टीव्ही क्षेत्रातील ‘छोटी बहू’ अभिनेत्री रुबीना दिलैक आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिलीप जोशी यांच्यावर अनेक गंमतीदार मिम्स व्हायरल होत आहेत. परंतु या दोघांवर मीम्स व्हायरल होण्यासाठी काय कारण आहे असा प्रश्न लोकांना पडला. अभिनेत्री रुबीना दिलैक आणि अभिनेते दिलीप जोशी या दोघांमध्ये काही साम्य गोष्टी नेटकऱ्यांनी शोधून काढल्या आहेत. त्यामूळे या व्हायरल मिम्सने लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

जर तस पहायला गेलं तर दोघांमध्ये कोणतीच समानता दिसून येत नाही. पण नेटकऱ्यांनी हा गैरसमज देखील दूर केलाय. #RubinaDilaik as #Jethalal हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड करतोय. या ट्विटर युजरने छोटी बहू म्हणजेच रुबीना दिलैक आणि जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सवर एक स्पेशल थ्रेड शेअर केला. त्यानंतर त्याच्या या ट्विटवर अनेकांनी सहभाग घेतला आणि दोघांवरचे एकापेक्षा एक भारी मीम्स सोशल मीडियावर धूमाकुळ घालण्यास सुरूवात झाली. अभिनेत्री रुबीना दिलैक आणि अभिनेते दिलीप जोशी यांची तगडी फॅन फॉलोइंग आहे. त्यामूळे त्यांचे चाहते सुद्धा हे मीम्स एन्जॉय करताना दिसून येत आहेत. नेमक्या काय आहेत या मीम्स पहा.

दोघांच्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेते दिलीप जोशी हे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत जेठालालचे पात्र साकारत आहेत. केवळ जेठालाल यांच्या विनोदांसाठी ही मालिका अगदी पुन्हा पुन्हा पाहणारे देखील काही चाहते वर्ग आहेत. जेठालाल म्हणजे या मालिकेचा आत्मा आहेत, असंही काही चाहते मानतात. या मालिकेने आतापर्यंत ३००० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. २००८ मध्ये या मालिकाचं पहिलं प्रीमियर रिलीज झालं होतं.

‘बिग बॉस १४’ मध्ये झळकली होती रुबीना दिलैक

रुबीना सध्या कलर्सवरील लोकप्रिय मालिका ‘शक्‍त‍ि- अस्‍त‍ित्‍व के एहासास की’मधे प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. तिला या मालिकेसाठी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. रुबीना लवकरच ‘अर्ध’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. यात पलाश मुच्छल देखील दिग्दर्शक म्हणून बॉलिवुडमधे पदार्पण करणार आहे. रुबीना बरोबर यात ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेता हितेन तेजवानी आणि कॉमेडियन राजपाल यादव देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटचे चित्रीकरण सप्टेंबेर महिन्यात सुरू होणार असून हा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.