‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सुपरहिट मालिकेमुळे नावारुपास आलेला अभिनेता हाफर ज्युलिअस ब्रिऑन्सन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. जबरदस्त शक्तिसाठी ओळखल्या जाणाऱ्या हाफरने एक जागतिक विक्रम केला. त्याने तब्बल ५०१ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला आहे.

हाफर ब्रिऑन्सन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो आपल्या वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर करतो. यावेळी त्याने डेड लिफ्लिंट करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो विश्व विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. त्याने तब्बल एक हजार १०४ पाऊंड म्हणजेच ५०१ किलो वजन उचलले. यापूर्वी सर्वाधिक वजन उचलण्याचा विक्रम पैलवान Eddie Hallच्या नावावर होता. त्याने २०१६मध्ये ५०० किलो वजन उचलले होते.

 

View this post on Instagram

 

I have no words. What an amazing day, one I will remember for the rest of my life. I said I was coming for it and once I set my mind on something I’m a dog with a bone. Want to give a huge shoutout to my family, friends, coaches, fans, sponsors and haters, all of whom helped this lift be possible. If you want to show some extra support head over to my YouTube, hit subscribe and check out my latest video where you can see some behind the scenes! Thank you all for your support! Support a family business – hafthorbjornsson.com . @roguefitness @reignbodyfuel @revive_md @transparentlabs @sbdapparel @kindafitkindafat_apparel @freezesleeve @coresportsworld @worldsultimatestrongman @australianstrengthcoach @stanefferding @theverticaldiet @andrireyr @stefansolvi @runarhrodi @kelc33

A post shared by Hafþór Júlíus Björnsson (@thorbjornsson) on

विश्वविक्रम केल्यानंतर ESPNला दिलेल्या मुलाखतीत हाफर म्हणाला, “मी काय बोलू? माझ्याकडे व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत. एकदा एखादी गोष्ट मी मनावर घेतली की ती तडीला लावेपर्यंत शांत बसत नाही. या क्षणासाठी मी खुप मेहनत केली होती. माझे कुटुंबिय, फॅन्स, प्रशिक्षक, मित्र मंडळी यांचे आभार त्यांच्या प्रोत्साहनामुळे हा विक्रम मी करु शकलो.”