राज्यातील शहरी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच पाणी देखील साचलं. या मुसळधार पावसावर अभिनेत्री गौहर खान नाराज झाली आहे. पावसाला थांबवण्यासाठी ती चक्क ‘रेन पोलीस’ झाली आहे. तिचा हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “करण माझ्यावर हसला होता म्हणून आज रडतोय”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

गौहरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क पावसाला धमकावताना दिसत आहे. “जा आपल्या घरी आणखी किती पडणार? तुझ्यासाठी लॉकडाउन वॉकडाउन नाही आहे का?” असा संवाद तिने या व्हिडीओद्वारे पावसासोबत केला आहे. हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत एक लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

PHOTO : शाहरुखच्या हास्याची तुलना चॉकलेटशी; अभिनेत्रीने दिल्या गोड शुभेच्छा

मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस बरसणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह सभोवतालच्या परिसरात ढगांची गर्दी झाल्याचे रडार व सॅटेलाइट इमेजेच्या माध्यमातून दिसत आहे. दक्षिण कोकणचा भागही ढगांनी व्यापला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी दोन वाजेपर्यंत मागील सहा तासात ४० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.