‘बिग बॉस’ फेम गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांच्या जोडीला बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोडीच्या यादीत पाहिलं जातं. हे दोघेही नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. गेल्या डिसेंबर महिन्यातच या दोघांचा निकाह पार पडला आणि नुकतंच हे दोघे निकाहच्या ६ महिन्यांनी हनीमूनला गेले होते. अशातच अभिनेत्री गौहर खानने एक आश्चर्यजनक खुलासा केलाय. पती जैदने लग्नासाठी तिच्यापुढे एक अट ठेवली होती, ही अट तिने नुकतीच पूर्ण केली असल्याचं अभिनेत्री गौहर खानने सांगितलंय.
‘बिग बॉस’ फेम गौहर खान नुकतीच ‘कॉफी टाइम विद ग्रिहा’ या शोमध्ये पोहोचली होती. या शो दरम्यान तिने आपल्या पर्सनल लाइफ आणि लग्नाबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. लग्नानंतर एक किस्सा शेअर करताना तिने सांगितलं की, “जैद मला म्हणाला होता की, मी तुझ्यासाठी तुझ्या कामाचं शेड्यूल सगळं मॅनेज करेल. पण जर तू लग्नात हातावर मेहंदी लावली नाही तर मी लग्न करणार नाही. खरं तर जैदला हातावरची मेहंदी खूप आवडते आणि मी लग्नात हातावर मेहंदी लावावी अशी त्याची खूप इच्छा होती.”
हे देखील वाचा: अर्ध्या तासांत सगळं संपवून टाकेन; प्रत्युषा बनर्जीचे ‘ते’ शेवटचे शब्द
View this post on Instagram
लग्नानंतर होतं शूटिंग
यापुढे बोलताना अभिनेत्री गौहर खान म्हणाली, “मला हातावर मेहंदी लावायची नव्हती. कारण लग्नानंतर काही दिवसातच मला माझ्या ’14 फेरे’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत जायचं होतं.” यापूर्वी तिने दिलेल्या आणखी एका मुलाखतीत बोलताना जैद खूपच सपोर्टिव असल्याचं सांगत लग्नानंतर तो अनेकदा तिच्यासोबत शूटिंगसाठी देखील आला होता, असं सांगितलं.
हे देखील वाचा: सोशल मीडियावरून समंथाने सासरचं नाव हटवलं, नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण
चित्रपटात गौहरच्या हातावर लग्नाची मेहंदी होती…
अभिनेत्री गौहर खानने तिच्या चित्रपटातील अनुभवाबद्दल बोलताना सांगितलं की, ‘१४ फेरे’ चित्रपटात माझ्या हातावर जी मेहंदी आहे ती माझ्या लग्नात लावलेली आहे. माहित नाही अल्लाहने काय योजना बनवली होती…पण लग्नानंतर मला जे शूटिंग करावं लागलं त्यातले सगळे सीन्स हे लग्नातलेच होते…त्यामुळे मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही झाला.”
अभिनेत्री गौहर खानचा ‘१४ फेरे’ हा चित्रपट नुकताच zee 5 वर रिलीज झालाय. या चित्रपटात अभिनेत्री विक्रांत मेस्सी आणि कृति खरबंदा हे दोघेही मुख्य भूमिकेत झळकले आहेत.