बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. तर राज कुंद्रासोबत अभिनेत्री गहना वशिष्ठवर देखील गंभीर आरोप आहेत. ‘गंदी बात’ फेम गहनाला फेब्रुवारी महिन्यात पॉर्न चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात गहना सध्या जामीनावर सुटली आहे. एवढंच नाही तर गहना राज कुंद्रच्या कंपनीसोबत काम करत असून त्याच्या कंपनीकरता पॉर्न चित्रपटाचे दिग्दर्शन करायची. तिचे काही चित्रपट हे पॉर्न आहेत असे पोलिस म्हणाले आहेत. या सगळ्यात आता गहानाने सोशल मीडियावर अशी गोष्ट केली आहे, ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता तिच्याकडे आहे.

गहनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून इन्स्टाग्राम लाईव्हने चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी तिच्या अंगावर एकही कपडा नाही आणि न्यूड आहे, असा दावा तिने केला आहे. यावेळी गहना म्हणाली की ‘मी घाणेरडी दिसते का? हे पॉर्न आहे का? असे प्रश्न विचारत गहना म्हणाली, जेव्हा एकही कपडा न परिधान केलेला हा व्हिडीओ पॉर्न नाही तर, ज्या व्हिडीओमध्ये तिने कपडे घातले आहेत. त्या व्हिडीओला पॉर्न कसं बोलू शकतात?’ हा व्हिडीओ शेअर करत ‘मी एकही कपडा न घालता लाईव्ह आली आहे. परंतु हा व्हिडीओ अश्लली आहे असं कोणी म्हटलं नाही. पण जेव्हा मी कपडे घालून व्हिडीओ करते तेव्हा काही लोक दावा करतात की ते व्हिडीओ अश्लील आहेत असे कॅप्शन गहानाने तो व्हिडीओ शेअर करत दिले आहे.

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

आणखी वाचा : नेटकऱ्याने विचारले ‘तू व्हर्जिन आहेस का?’ सलमानचे उदाहरण देत टायगर म्हणाला..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॉनोग्राफी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने पुन्हा एकदा गहाना वशिष्ठला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. यावेळी गहनाने चौकशी आधीच न्यायालयात धाव घेतली आहे. गहानाने अटकेपूर्वी जामीन अर्ज दाखल केला आहे. जेणेकरून पोलीस तिला पुन्हा अटक करू शकणार नाही. दुसरीकडे, १९ जुलै रोजी अटक करण्यात आलेला राज कुंद्रा अजूनही आर्थर रोड जेलमध्ये आहे. तो आधी २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत होता, तर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राज कुंद्राने जामिना मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.