हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी आता जुळ्यांचा पिता बनला आहे. क्लूनीची पत्नी अमालने मंगळवारी एक मुलगा आणि एक मुलीला जन्म दिला. सप्टेंबर २०१४ मध्ये इटलीमध्ये दोघांनी लग्न केलं होतं. क्लूनीने अमालला तब्बल ४५० पाऊंड्सची अंगठी देऊन प्रपोज केलं होतं. अमाल ही जॉर्जची दूसरी पत्नी आहे तर अमालचे हे पहिले लग्न आहे. अमाल जॉर्जपेक्षा वयाने जवळपास १७ वर्षांनी लहान आहे. दोघांनी आपल्या मुलीचे नाव ‘एला’ आणि मुलाचे नाव ‘अलेक्झांडर’ असे ठेवले आहे.

जॉर्ज हॉलिवूडच्या सर्वांत यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. मध्यंतरी जॉर्ज आणि अमालच्या घटस्फोटाची चर्चा झाली होती मात्र नंतर ही चर्चा खोटी ठरली. अमाल ही एक प्रसिद्ध मानवाधिकार वकील आहे. त्याचप्रमाणे ‘कोलंबिया लॉ स्कूल’मध्ये ती प्राध्यापकसुद्धा आहे.

george-clooney-amal-clooney-casually-mentioned-pregnancy-to-julie-chen-759

वाचा : ‘क्वीन’च्या तमिळ रिमेकमध्ये तमन्नाऐवजी दिसणार ‘ही’ अभिनेत्री?

अनेक मोठ्यमोठ्या आणि नावाजलेल्या व्यक्तींचा अमालच्या क्लायंट्समध्ये समावेश आहे. यामध्ये विकीलीक्सचे संस्थापक जुलीयन असांज यांचेही नाव आहे. त्याचप्रमाणे अमालने युक्रेनचे माजी पंतप्रधान, युलिया टिमोशेंको आणि इजिप्तशियन- कॅनेडियन पत्रकार मोहम्मद फामी यांचेही प्रतिनिधित्व केले आहे. तर दुसऱ्या बाजूला जॉर्जसुद्धा दोन वेळा ऑस्कर विजेता हॉलिवूड अभिनेता आहे. एला आणि अलेक्झांडर या चिमुकल्यांच्या आगमनाने जॉर्ज आणि अमालच्या आयुष्यात एक नवीन सुखद पर्व सुरू झाले आहे.