महाराष्ट्रात मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्स न मिळणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. हिंदी, इंग्रजी, तेलगू, मल्याळम, गुजराती आणि इतर भाषिक चित्रपटांच्या भाऊगर्दित मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्स थिएटर्स मिळणे आणि जर का मिळालेच, तरी अपेक्षित वेळा मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे चित्रपटाची निर्मिती दर्जेदार आणि प्रेक्षकांची इच्छा असूनही मराठी सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रेक्षकांची निराशा आणि निर्मात्यांचे मोठे नुकसान होते आहे. अशीच नामुष्की २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या मास फिल्म्स प्रस्तुत आणि महेश काळे दिग्दर्शित ‘घुमा’ या चित्रपटावर ओढावली आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन निर्माते मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, सारंग बारस्कर आणि संतोष इंगळे यांनी मातोश्रीवर धाव घेतली.

वाचा : Fat to Fab ‘चिडिया घर’ फेम अभिनेत्रीचा नवा लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे ओस पडत चाललेल्या मराठी शाळा आणि एकूणच शालेय शिक्षण पद्धतीवर मार्मिक भाष्य करणारा ‘घुमा’ हा चित्रपट आहे. महाराष्ट्रातील जनतेला ‘घुमा’ हा सिनेमा पाहता यावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्मात्यांची बाजू एकून घेतली आणि स्वत: जातीने लक्ष देईन असे आश्वासन दिले.

‘शिवसेना पूर्णपणे तुमच्या पाठिशी उभी आहे. कोणतीही अडचण आल्यास शिवसैनिक ती लगेच दूर करतील. मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना कुणाचीही पर्वा करणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. हा सिनेमा प्रत्येक मराठी माणूस पाहणार याची मला खात्री आहे.’ असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

वाचा : सलमान छोट्या पडद्यावरील मानधनाचा ‘बिग बॉस’

‘घुमा’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे माहितीपत्र शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. या प्रसंगी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार अनिल देसाई, पारनेरचे आमदार विजयराव औटी तसेच अहमदनगरचे शिवसेना नेते अनिलभैय्या राठोड उपस्थित होते.