एखाद्या विषयावर मतं मांडण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी सहज उपलब्ध असणारं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर सध्या ट्रोल होण्याची शक्यताही फार असते. त्यातही सेलिब्रिटी म्हटल्यावर ट्रोलिंगच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. सेलिब्रिटींच्या फोटोवरून, त्यांच्या ट्विटवरून बऱ्याचदा नेटिझन्सकडून टीका होत असतात. अभिनेता अर्जुन कपूर अशाच एका ट्रोलमुळे सध्या चर्चेत आहे.

ट्विटरवर एका तरुणीने अर्जुन कपूरचा उल्लेख करत ट्विट केलं की, ‘तू खलनायकासारखा दिसत असून तुझ्याकडून नकारात्मक ऊर्जा मिळते. तुझ्यासारख्या बलात्कारी पुरुषाला बॉलिवूडमधून हकलून दिलं पाहिजे.’ तरुणीच्या या ट्विटला अर्जुननेही उत्तर दिलं. ‘एक महिला, एक तरुणी जेव्हा निर्लज्जपणे आणि इतक्या सहजपणे एखाद्यासाठी ‘रेपिस्ट’ हा शब्द सोशल मीडियावर वापरते, तेव्हा हे ट्रोलिंग नसून अत्यंत दु:खदायक आहे,’ असं ट्विट करत अर्जुनने त्या तरुणीला सडेतोड दिलं.

PHOTO : जब सायना मेट ‘बाहुबली’

अर्जुनच्या या उत्तरानंतर त्या तरुणीने तिचं ट्विट डिलीट केलं. मात्र त्यानंतर अर्जुनच्या चाहत्यांनी त्या तरुणीवर टीका करण्यास सुरूवात केली. विनाकारण एखाद्यावर अशा प्रकारचे आरोप केल्याप्रकरणी नेटिझन्सनी तिला ट्विटरच्या माध्यमातून खडेबोल सुनावले.

काही दिवसांपूर्वी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने ट्रोलिंगवर त्याचं मतं व्यक्त केलं होतं. तो म्हणाला की, ‘ट्रोलिंग आता जणू सोशल मीडियाचा भागच झाला आहे. की-बोर्डच्या मागे लपून एखाद्यावर टीकाटीप्पणी करण्यात लोकांना मजा येते. हे लज्जास्पद आहे. तुम्ही या गोष्टींना रोखू शकत नाही आणि ट्रोलिंग सोशल मीडियाची ताकद आहे हेच दुर्दैवी आहे. तुम्ही कोणालाही काहीही बोलू शकता.’

Story img Loader