बॉलिवूडमध्ये अॅक्शनपटांसाठी नावाजला जाणाऱ्या रोहित शेट्टीचा ‘गोलमाल अगेन’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर काल सर्वत्र प्रदर्शित झाला. अजय देवगण, अर्षद वारसी, तब्बू, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू आणि परिणीती चोप्रा अशी मोठी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट पहिल्या दिवशी १८-२० कोटी रुपयांची कमाई करेल असे म्हटले जात होते. पण, कोणीही विचार केला नसेल अशी कमाई या चित्रपटाने केली आहे.

वाचा : ‘आठवणीतील दिवाळी म्हटली की ‘मोती साबणा’चा सुवास अजूनही गंधित होत जातो’

Ghilli re release record break box office collection
पुन्हा प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई, अवघ्या ८ कोटींचं बजेट अन् २० वर्षांनी कमावले तब्बल…
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत

अजयचा ‘गोलमाल अगेन’ आणि आमिर खानची निर्मिती असलेला ‘सिक्रेट सुपरस्टार’ हे एकाचवेळी प्रदर्शित झाल्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये स्क्रिन्स वाटल्या गेल्या. ‘गोलमाल अगेन’ ३५०० स्क्रिन्सवर तर ‘सिक्रेट सुपरस्टार’ १७५० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. ‘गोलमाल’ सीरिजमधील या चौथा चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई केली. तर झायरा वसिमची मुख्य भूमिका असलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ने केवळ ४.५० कोटी रुपयांची कमाई केली.

वाचा : ‘सेलिब्रिटी रेसिपी’ प्रिया बेर्डेची ‘डाएट स्पेशल नॉनव्हेज रेसिपी’

विनोदाचा पुरेपूर भरणा असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे प्रेक्षकांनीही चित्रपटगृहाकडे वळण्यास पसंती दिली. यंदाच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ने प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांत ६४.७७ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘जॉली एलएलबी २’, ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटांनी बऱ्यापैकी कमाई केल्याचे पाहायला मिळाले. हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टी निराशाजनक असेच होते. त्यामुळे आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जात आहेत.