बॉलिवूडमध्ये ‘हिरो नंबर वन’ म्हणून प्रसिद्ध असलेला गोविंदा बराच काळ चित्रपटांपासून दूर असला तरी सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो नियमित अंतराने त्याचे अपडेट्स देण्यासाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. गोविंदाने त्याचा नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदा ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपटातील ‘मेरे प्यार का रस जरा चखना’ या हिट गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये डान्स करत चाहत्यांची मनं जिंकली आहे.

अभिनेता गोविंदाने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तो एका कार्यक्रमात पोहोचला होता. या कार्यक्रमात गोविंदाला डान्स करण्यासाठी विनंती करण्यात आली. डान्स करण्यासाठी विनंती करणाऱ्यांना नाराज न करता हिरो नंबर वन गोविंदाने ‘मेरे प्यार का रस जरा चखना’ या हिट गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ जवळपास 2 लोकांनी पाहिलाय. तसंच चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

आणखी वाचा : बॉलिवूडमध्येही साजरा होतोय शिक्षक दिन; #HappyTeachersDay2021 होतोय ट्रेंड

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

आणखी वाचा : “या बाईने माझ्या भावाला फसवलंय”; प्रिया दत्तने संजय दत्तची पत्नी मान्यतावर केला होता आरोप
गोविंदा अखेरला ‘रंगीला राजा’ आणि ‘आ गया हीरो’ चित्रपटात दिसला होता. गोविंदाने 1980 मध्ये अॅक्शन आणि डान्सिंग हिरो म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 90 च्या दशकात विनोदी नायक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ‘इलझम’, ‘हटिया’, ‘जीत हैं शान से’ आणि ‘हम” या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलं नाव कमावलंय. १९९२ मध्ये रिलीज झालेल्या ‘शोला और शबनम’ या रोमॅण्टिक चित्रपटामध्ये गोविंदाने एका तरुण NCC कॅडेटची भूमिका साकारली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.