भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा काल ११ डिसेंबरला विवाहबद्ध झाले. डेस्टिनेशन वेडिंगसाठी त्यांनी इटली हा निसर्गरम्य देश निवडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ जेवढे पाहू तेवढे कमीच अशी काहीशी अवस्था त्यांच्या चाहत्यांची झाली आहे. त्यांचे प्रत्येक फोटो हे एकाहून एक सरस असे आहेत. अनुष्काने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता, तर विराटनेही त्याला साजेसे कपडे घातले होते. दोघंही राजा-राणींपेक्षा कमी दिसत नव्हते. इटलीपासून सुमारे १००० किलोमीटर दूर टस्कनी गावात हे लग्न झाले. विरुष्काचे चाहते या लग्नाशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

 

विराट कोहली, अनुष्का शर्मा

आतापर्यंत साऱ्यांनाच असे वाटत होते की या दोघांची ओळख एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली. अमर उजालाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, अनुष्का आणि विराट हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. अनुष्काची ८२ वर्षाची आजी उर्मिला देहरादूनमध्ये राहत असून, विराट आणि अनुष्का लहानपणापासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती त्यांनी दिली. लहानपणी विराट आणि अनुष्काने एकत्र क्रिकेट खेळल्याचेदेखील  त्यांनी सांगितले. अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा विराट त्यांच्या घरी खेळायला जायचा. विराट कोहलीला अनुष्काचे संपूर्ण कुटुंब फार पूर्वीपासूनच ओळखत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
विराट कोहली, अनुष्का शर्मा

२१ डिसेंबरला दिल्लीमध्ये आणि २६ डिसेंबरला मुंबईमध्ये शाही रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे. या रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी आवर्जुन येतील यात काही शंका नाही. विरुष्काने ज्या ठिकाणी लग्न केले ते स्थळ ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी जगातील महाग स्थळांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. नाताळ आणि नवीन वर्षांदरम्यान या स्थळाची एका आठवड्यासाठीची किंमत सुमारे ९४ लाख रुपये इतकी असते.