या फोटोमधील चिमुकल्याला ओळखलंत का? बाजूला असलेल्या टेबलावर हात ठेवून उभा असलेल्या या मुलाच्या चेहऱ्यावर अगदी अवाक् भाव दिसून येत आहेत. पण हा चिमुकला आता अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवतोय. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे तो सर्वांच्याच अधिक परिचयाचा झाला आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दु:ख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा हा चिमुकला आहे अभिनेता भालचंद्र कदम अर्थात प्रेक्षकांचा लाडका भाऊ कदम.

भाऊ कदम हे आजच्या घडीला मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहे. इतकं यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदमच्या स्वभावातील साधेपणा आजही कायम आहे. त्यामुळेच साधं राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे भाऊ कदम रसिकांचा लाडका बनला आहे. भाऊने त्याच्या लहानपणीचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता.

sharad pawar raj thackeray
“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”, शरद पवारांचा टोला, ‘त्या’ टीकेवर दोन वाक्यात प्रत्युत्तर
controversy over chhatrapati shivaji maharaj s jiretop on modi head
मोदींच्या जिरेटोपावरून नव्या वादाला तोंड; छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची प्रफुल पटेलांवर टीका
lok sabha 2024, election 2024, lok sabha fourth phase, nda, india alliance, bjo, congress, regional parties, lok sabha analysis, marathi news, marathi article, politics article,
योगेंद्र यादवांच्या मते, चौथा मतदान-टप्पा ‘अनिर्णित’पणाकडे झुकणारा…
What is the background of Dr Narendra Dabholkar murder case Who is the accused and What is the charge
विश्लेषण : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी काय? आरोपी कोण? आरोप काय?
Financial burden, Mhada, lease,
भाडेपट्ट्यात सवलत न दिल्याने म्हाडावासीयांवर आर्थिक बोजा!
To end the politics of revenge and terror in the country make Shashikant Shinde win says Sharad Pawar
देशातील सुडाचे राजकारण व दहशत संपवण्यासाठी सर्वसामान्य शशिकांत शिंदे यांना विजयी करा- शरद पवार
Wardha Police, mahatma Gandhi s proverbial monkey idea, Combat Rising Cybercrime, marathi news, cyber police, cyber crime news, wardha news, wardha police news,
महात्मा गांधी यांची प्रतीके अन् वर्धा पोलिसांची नाविन्यपूर्ण…
sanjay raut
“औरंगजेबाप्रमाणे मोदी अन् शाहांच्या महाराष्ट्रावर स्वाऱ्या”; संजय राऊतांची टीका; म्हणाले, “काही भटकते आत्मे…”

एका मुलाखतीत आपल्या भूमिकांविषयी भाऊ म्हणालेला की, “विनोदामुळे दु:ख हलके होते. मी गंभीर भूमिका केल्यास प्रेक्षकांनाही आवडणार नाही.” ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमासोबत भाऊ कदम काही चित्रपट आणि नाटकांमध्येही काम करतोय. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे भाऊला आपल्या कुटुंबाला फारसा वेळ द्यायला मिळत नाही. पण शूटिंग नसताना तो कुटुंबीयांसोबत निवांत क्षण आवर्जून घालवतो. भाऊ व ममता यांच्या सुखी संसारात त्यांच्या तीन मुलीही आहेत. मृण्मयी, संचिती आणि समृद्धी अशी भाऊच्या लाडक्या लेकींची नावं आहेत.