‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्री सोफी टर्नर आणि जो जोनास यांनी गेल्या वर्षी लग्न केलं. त्यांच्या लग्नाची चर्चा भारतातही मोठ्या प्रमाणावर झाली. कारण सोफीने अभिनेत्री प्रिकांच्या चोप्राच्या पतीच्या भावाशी लग्न केलं. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे सोफी आणि जो यांच्या पालकांना त्यांच्या लग्नाची माहितीच नव्हती. “आम्ही लग्न केलं आहे.” ही बातमी पालकांना सांगायला आम्ही विसरलो. असा आश्चर्यचकित करणारा खुलासा जोने केला आहे.
सर्वाधिक वाचकपसंती – भारतातील लोक ‘या’ अभिनेत्रीला दररोज करतात सर्च
जीक्यू मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जो म्हणाला, “आम्ही अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणालाही कळवण्याचा वेळ मिळाला नाही. गेली पाच वर्षे आम्ही एकमेकांना डेट करत होतो. एकत्र राहात होतो. एके दिवशी रात्री आमच्या मनात लग्न करण्याचा विचार आला. परिणामी दुसऱ्याच दिवशी कोर्टात जाउन आम्ही लग्न केलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांचा फोन आला होता. परंतु त्यांना मी लग्न केलं आहे हेच सांगायला विसरलो. खरं तर त्यांना कुठल्याशा वृत्तपत्रातून ही माहिती मिळाली होती. त्यांनतर आम्ही पालकांची माफी मागितली. पुढे पालकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा आम्हाला लग्न करावं लागलं.”
सर्वाधिक वाचकपसंती – “लॉकडाउन त्वरीत उठवा, अन्यथा…”; अभिनेत्याची सरकारकडे मागणी
सोफी टर्नर हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आजवर ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’, ‘एक्स मेन’, ‘अनदर मी’, ‘हायवे’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सीरिजमुळे सोफीला खरी लोकप्रियता मिळाली होती. या सीरिजमध्ये तिने सँसा स्टार्क ही लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारली होती.