नवी दिल्लीमध्ये लहानाची मोठी झालेली अभिनेत्री क्रिती सनॉनचा आज वाढदिवस. क्रिती आज २७ वर्षांची झाली. नवी दिल्लीतील न्यू दिल्ली पब्लिक स्कूल आरके पुरम शाळेत क्रितीचे शिक्षण झाले. यानंतर क्रितीने इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशनमध्ये बी. टेक केले. वयाच्या पाचव्याच वर्षी क्रितीने मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्यासोबत रॅम्प वॉक केले होते. मॉडेलिंग करणं हा तिचा फक्त छंद होता. तिला पहिल्यापासून ओढ होती ती बॉलिवूडची.

आतापर्यंत क्रितीचे ‘हिरोपंती’, ‘दिलवाले’ आणि ‘राबता’ हे तीन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. या तीन सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाचा ठसा बॉलिवूडमध्ये उमटवायला सुरूवात केली असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ऑगस्टमध्ये तिचा ‘बरेली की बर्फी’ हा चौथा सिनेमाही प्रदर्शित होत आहे. मॉडेलिंगमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर तिने सायकॉलिजिकल थ्रिलर सिनेमा ‘१: नेनोक्कदिने’ या तेलगू सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुपरस्टार महेश बाबूंसोबत तिने या सिनेमात काम केले होते. पण मोठ्या पडद्यावर येण्यापूर्वी क्रितीने अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे.

200 Years Later Shani Jayanti 2024 Nakshtra Gochar
चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी
Prajwal Revanna Rape Victime
“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा
374 Days Later Guru Enters In Shukra Rashi Big Changes Till 2025 The Kundali Of 3 Rashi Can become Billionaire
३७४ दिवसांनी गुरुचे बळ वाढले; २०२५ पर्यंत वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी, व्हाल धनाचे मालक
budh gochar 2024 astrology mercury planet transit of gemini in may will change the luck of these zodiac sing get more profit know
वर्षानंतर बुधाचा मिथुन राशीत प्रवेश; ‘या’ राशीधारकांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण? धन-संपत्तीत भरभराटीची शक्यता
Shekhar Suman Emotional Post
“रात्रभर मी त्याच्या मृतदेहाजवळ…”, ११ वर्षांच्या मुलाच्या निधनाचा तो प्रसंग सांगताना शेखर सुमन भावूक
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..

क्रितीचे लहानपणीचे फोटो पाहिलेत का?

आतापर्यंत तिने विवेल सोप, क्लोज अप, अमुल आईस्क्रिम अशा अनेक ब्रॅण्डसाठी जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातींमुळे ती खरी प्रकाशझोतात आली. आज तिच्या वाढदिवसादिवशी तिच्या याच काही जुन्या आठवणींना दिलेला उजाळा..

बोल्ड आणि ब्युटीफूल अशा क्रिती सनोनला येणारे वर्ष खूप आनंद आणि यश देऊन जावो, अशाच ‘लोकसत्ता ऑनलाइन टीम’कडून शुभेच्छा!