आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी कमालीचा थरारक ठरला. चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम फेरीतही बड्या संघांना धक्कातंत्र देण्याचं सत्र कायम ठेवलं. या पराभवाचा भारतीय क्रिकेटरसिकांना चांगलाच धक्का बसला. पण, त्यातूनही सावरत सामना जिंकण्यासाठी हार्दिक पांड्याने Hardik Pandya केलेल्या खेळीची क्रिकेटप्रेमींनी प्रशंसा केली. कमी चेंडूमध्ये जलद गतीने अर्धशतक ठोकून हार्दिक या सामन्यात हिरो ठरला. त्याच्यासमोर भारताचे स्टार खेळाडू कोहली, रोहित, शिखर, युवराज आणि धोनी हे ‘झिरो’ ठरले.
वाचा : ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ म्हणणाऱ्या पाकिस्तानी समर्थकाला रितेशचे खणखणीत प्रत्युत्तर
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात चमकलेल्या हार्दिकबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. एखाद्या हिरोप्रमाणे दिसणारा हा क्रिकेटपटू एका मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा गेल्यावर्षी सुरु होती. कालांतराने हार्दिकच्या एका ट्विटमुळे या चर्चेला पूर्णविराम लागला हेही तितकच खरं आहे. हार्दिकने ट्विट करून असे काहीही नसल्याचे सांगितल्याने त्याच्या प्रेमप्रकरणाबद्दलच्या चर्चा थांबल्या. पण, आता हार्दिकच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याच्या निमित्ताने त्याच्या पूर्वायुष्यातील गोष्टींचा आता मागोवा घेतला जात असल्याने लिशा शर्मा Lisha Sharma या मॉडेलचं नाव आता पुन्हा चर्चेत आलं आहे.
वाचा : रोल मिळवण्यासाठी अनुपम खेर यांनी कोणाला केले १२ फोन
जमशेदपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या लिशा शर्मा या सुंदर मॉडेलला हार्दिक गेल्या वर्षी डेट करत असल्याची चर्चा होती. हार्दिक निळ्या डोळ्यांच्या लिशाच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, लिशानेही त्याच्यासोबतचे काही सेल्फी सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर ते फोटो तिने डिलिट करून टाकले.
दरम्यान, यावर्षी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हार्दिकने तो ‘सिंगल’ असल्याचे ट्विट केले होते. या सर्व अफवांचा मला माझ्या खेळावर कोणताही परिणाम होऊ देण्याची इच्छा नाही, असे म्हणत कृपा करून हे थांबवा असे त्याने ट्विट केले. पण, लिशाने त्याच्यासोबतचे सेल्फी डिलिट का केले? असा सवाल केला जातोय. त्यामुळे नक्की हार्दिक ‘सिंगल’ आहे की नाही हे सांगणे कठीणच आहे.