भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. एकीकडे अभिनेत्री एली अवरामला तो डेट करत असल्याचे तर्कवितर्क लावले जात असतानाच आता त्याचं नाव अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत जोडलं जात आहे. नुकत्याच एका पार्टीत हार्दिक पांड्याला उर्वशीसोबत फ्लर्ट करताना पाहिलं गेलं.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार व्यावसायिक गौतम सिंघानियाच्या पार्टीमध्ये या दोघांची भेट झाली. पार्टीत ज्याप्रकारे हे दोघं एकमेकांशी बोलत होते, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय, हाच प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

https://www.instagram.com/p/Bhiox6QB4Dy/

Bigg Boss Marathi: पहिली विकेट आरती सोलंकीची!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी हार्दिक आणि एली अवरामच्या ‘सिक्रेट डेटिंग’च्या चर्चांनी जोर धरला होता. गेल्या वर्षी हार्दिकचा भाऊ कृणालचं लग्न झालं. त्यावेळी एलीने आवर्जून लग्नाला उपस्थिती लावली होती. तेव्हापासूनच या दोघांमध्ये नाते असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये एली सहभागी झाली होती. तेथूनच तिचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं. मनिष पॉलसह एलीने ‘मिकी वायरस’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याचसह तिनं ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’, ‘हाऊसफुल्ल ३’, ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटांमध्येही काम केलं आहे.