अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने ‘मिर्ज्या’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पादर्पण केलंय. काही सिनेमांमध्ये काम केल्यानंतरही हर्षवर्धनला अद्याप फारसं यश मिळालेलं नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धनेन त्याच्या पहिल्या सिनेमांनतर त्याला आलेल्या काही अनुभवांचा खुलासा केला आहे. निर्मात्याने मुलाखतींमध्ये बावळटपणाचा आव आणण्याचा सल्ला दिल्याचा खुलासा हर्षवर्धनने केला आहे.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन म्हणाला, “”मिर्ज्या या सिनेमानंतर मी जरा जपून वागू लागलो. मी तसा अगदी मनमोकळेपणाने, प्रामाणिकपणे आणि मनसोक्त गप्पा मारणारा व्यक्ती होतो. मात्र मिर्ज्यानंतर मला लक्षात आलं की मी बोलताना जरा जपून बोललं पाहिजे. मी जेव्हा मुलाखत देतो तेव्हा मला प्रामाणिक राहणं आवडतं. मात्र मुलाखत घेणाऱ्याने देखील हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला मुलाखत देत असलेली व्यक्ती प्रामाणिक असून एका चांगल्या कुटुंबातील आहे, तो आपल्यावर विश्वास ठेवतोय तर आपणही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे.” असं हर्षवर्धन म्हणाला.
पुढे हर्षवर्धन म्हणाला, “मी ऑफ-बीट सिनेमा करत होतो. लोकांचं अनिल कपूर यांच्यावर एवढं प्रेम आहे की त्यामुळे मी एका विशिष्ट प्रकारचं काम करावं अशा त्यांच्या अपेक्षा होत्या. मात्र जर तुमचं व्यक्तीमत्व वेगळं असेल आणि तुम्ही तुमच्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच वागत असाल तर लोक तुम्हाला स्विकारतील असा विचार करणंही भोळसटपणा आहे.” असं हर्षवर्धन म्हणाला पुढे तो म्हणाला, ” काही निर्मात्यांनी मला मुलाखतींमध्ये बावळटपणाचा आव आणण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले मी खूप हुशार आहे यामुळे कदाचिक प्रेक्षक दुरावू शकतात.” असा सल्ला निर्मात्यांनी दिल्याचं हर्षवर्धन म्हणाला.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अंथोलॉजी वेब सीरिजमध्ये हर्षवर्धन नुकताच झळकला होता. तसचं अभिनव बिंद्रा यांच्या बायपिकमध्ये बर्षवर्धन झळकणार अशा चर्चा आहेत.