अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने ‘मिर्ज्या’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पादर्पण केलंय. काही सिनेमांमध्ये काम केल्यानंतरही हर्षवर्धनला अद्याप फारसं यश मिळालेलं नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धनेन त्याच्या पहिल्या सिनेमांनतर त्याला आलेल्या काही अनुभवांचा खुलासा केला आहे. निर्मात्याने मुलाखतींमध्ये बावळटपणाचा आव आणण्याचा सल्ला दिल्याचा खुलासा हर्षवर्धनने केला आहे.

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन म्हणाला, “”मिर्ज्या या सिनेमानंतर मी जरा जपून वागू लागलो. मी तसा अगदी मनमोकळेपणाने, प्रामाणिकपणे आणि मनसोक्त गप्पा मारणारा व्यक्ती होतो. मात्र मिर्ज्यानंतर मला लक्षात आलं की मी बोलताना जरा जपून बोललं पाहिजे. मी जेव्हा मुलाखत देतो तेव्हा मला प्रामाणिक राहणं आवडतं. मात्र मुलाखत घेणाऱ्याने देखील हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला मुलाखत देत असलेली व्यक्ती प्रामाणिक असून एका चांगल्या कुटुंबातील आहे, तो आपल्यावर विश्वास ठेवतोय तर आपणही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे.” असं हर्षवर्धन म्हणाला.

High court Denied Bail to Actor Sahil Khan, Mahadev Betting App Case, sahil khan denied bell in betting app case, Mahadev betting app, sahil khan, Mumbai high court, marathi news, Mahadev betting app news, marathi news, Mumbai news,
महादेव बेटिंग ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खानला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
d gukesh
अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

हे देखील वाचा: “दुसरी अनन्या पांडे”; बॉलिवूड पदार्पणापूर्वीच जाहिरातीच्या व्हिडीओमुळे शनाया कपूर ट्रोल

पुढे हर्षवर्धन म्हणाला, “मी ऑफ-बीट सिनेमा करत होतो. लोकांचं अनिल कपूर यांच्यावर एवढं प्रेम आहे की त्यामुळे मी एका विशिष्ट प्रकारचं काम करावं अशा त्यांच्या अपेक्षा होत्या. मात्र जर तुमचं व्यक्तीमत्व वेगळं असेल आणि तुम्ही तुमच्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच वागत असाल तर लोक तुम्हाला स्विकारतील असा विचार करणंही भोळसटपणा आहे.” असं हर्षवर्धन म्हणाला पुढे तो म्हणाला, ” काही निर्मात्यांनी मला मुलाखतींमध्ये बावळटपणाचा आव आणण्याचा सल्ला दिला होता.  ते म्हणाले मी खूप हुशार आहे यामुळे कदाचिक प्रेक्षक दुरावू शकतात.” असा सल्ला निर्मात्यांनी दिल्याचं हर्षवर्धन म्हणाला.


अंथोलॉजी वेब सीरिजमध्ये हर्षवर्धन नुकताच झळकला होता. तसचं अभिनव बिंद्रा यांच्या बायपिकमध्ये बर्षवर्धन झळकणार अशा चर्चा आहेत.