हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वी विनस्टीन लैंगिक शोषण प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आहे. हॉलिवूड मागोमाग बॉलिवूडमध्येही याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनी या निर्मात्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर हा विषय चर्चेत आला. पाश्चात्य चित्रपटसृष्टीचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड झाल्यानंतर सोशल मीडियावरही याविषयीच्या चर्चांनी जोर धरला. दरम्यान, हार्वीच्या क्रूर कृत्याबद्दल आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. त्यामुळे हार्वीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

वाचा : डुलक्या घेत गाडी चालवणाऱ्या चालकाला आमिरने थांबवलं

हॉलिवूडमधील सहायक निर्माती मिमी हिनेही हार्वीवर बलात्काराचा आरोप केला. २००६ मध्ये हार्वीकडे कामानिमित्त गेल्यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळी मला मासिक पाळी आली होती. पण त्याने कोणतीही दया दाखवली नाही, असे मिमीने न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत सांगितले.

हार्वीने मला सोहो येथील त्याच्या घरी बोलावले होते. मी तेथे गेले असता त्याने मला बळजबरीने त्याच्या बेडरुममध्ये नेले. मी त्याला खूप विरोध केला. पण माझे प्रयत्न व्यर्थ ठरले. मला मासिक पाळी आली असतानाही त्याने माझ्यावर शारीरिक अत्याचार केला.

वाचा : त्या प्रसंगी मला आत्महत्या करावीशी वाटली- कपिल शर्मा

मिमीबरोबरच इतर ५० हून अधिक महिलांनी हार्वीवर बलात्काराचा आरोप केला आहे.