बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये अनेकदा तू तू मै मै पाहायला मिळते. दोन अभिनेत्रींमधील शीतयुद्ध हे काही बॉलिवूडसाठी नवीन नाही आणि सध्या सोशल मीडिया यासाठी सर्रास वापरलं जातं. मतं, फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकदा कलाकार ऑनलाइन ट्रोलचे शिकार होतात आणि टीकांचा भडीमार त्यांच्यावर होऊ लागतो. सध्या अभिनेत्री क्रिती सनॉनसोबतही असंच काहीसं झालेलं आहे.

अर्जुन कपूर आणि अनिल कपूर या रिअल लाईफ काका-पुतण्याची जोडी ‘मुबारका’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ‘मुबारका’ चित्रपटातील एका गाण्यावर नाचतानाच्या क्रितीच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या. यामध्ये नेहमीच आपल्या बेताल आणि पोकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कमाल आर खान म्हणजेच केआरकेचाही समावेश आहे. ‘ही पाहा बिचारी क्रिती, राबता चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिचं मानसिक संतुलन बिघडलंय,’ अशा शब्दांत केआरकेने क्रितीचा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवर टिका केली.

https://twitter.com/kamaalrkhan/status/888714157478096896

केआरकेच्या या ट्विटला अनेकांनी सहमतीही दर्शवली. मात्र यानंतर एका अभिनेत्रीने अर्वाच्च शब्दांत क्रितीवर टीका केली. या अभिनेत्रीचं नाव आहे भैरवी गोस्वामी. ‘भेजा फ्राय’, ‘हेट स्टोरी’ यांसारख्या चित्रपटात या अभिनेत्रीने भूमिका साकारली. बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या भैरवीने क्रितीवर अर्वाच्च शब्दांत टीका केलीये. क्रिती अभिनेत्री झाली तरी कशी हा प्रश्न मला पडतो असं भैरवीने म्हटलंय.

भैरवीच्या या ट्विटवर क्रितीने अद्याप काही प्रत्युत्तर दिले नसून कदाचित तिला प्रत्युत्तर देणे तिने टाळलेही असावे. मात्र क्रितीचे चाहते तिची बाजू घेताना दिसत असून अनेकांनी भैरवीच्या ट्विटविरोधात आवाज उठवलाय.