एकापेक्षा एक दमदार आणि चौकटीबाहेरच्या भूमिका साकारत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा अशाच एका दमदार भूमिकेतून तो प्रेक्षकांसमोर येत आहे. ही भूमिका आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावात व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे यांची. या बायोपिकमध्ये नवाजुद्दीन बाळासाहेबांची भूमिका साकारणार असल्याचे जाहीर झाल्यावर वाद निर्माण झाला. एका मुस्लिमाने बाळासाहेबांची भूमिका साकारण्यावरून आक्षेप घेतला गेला.

‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती खासदार संजय राऊत करत असून त्यांनीच पटकथा लिहिली आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी स्वत: संजय राऊतांनीच नवाजुद्दीनची निवड केली. तर ही भूमिका मी साकारण्यात काहीच गैर नसल्याचं नवाजुद्दीनने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. ‘ठाकरे’वरून त्याच्यावर झालेल्या टीकांवर नवाजुद्दीन काय म्हणतो हे पाहुयात..

‘ठाकरे’ या चित्रपटात अभिनेत्री अमृता राव मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारत आहे. अभिजीत पानसे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं आहे. २५ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.