संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी केली. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाईदेखील केली. यातल्या प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं प्रेक्षक- समीक्षकांकडून कौतुकही झालं. मात्र फार क्वचित लोकांना माहित असेल की या चित्रपटातील एका भूमिकेसाठी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासला विचारण्यात आलं होतं.

राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीर यांची निवड आधीच झाली होती. पण महारावल रतन सिंहच्या भूमिकेसाठी कोणाची निवड करावी हा प्रश्न निर्मात्यांना पडला होता. ‘बाहुबली’ या चित्रपटातील प्रभासच्या अभिनयाने प्रभावित झालेले दिग्दर्शक भन्साळी यांना महारावल रतन सिंहच्या भूमिकेसाठी प्रभासला घेण्याचा विचार होता. त्यावेळी ‘बाहुबली २’च्या शूटिंगमध्ये व्यग्र असलेल्या प्रभासलाही भन्साळींसोबत काम करण्याची इच्छा होती.

वाचा : महिलेला फोनवर शिवीगाळ केल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्यविरोधात गुन्हा दाखल

‘पद्मावत’मध्ये महारावल रतन सिंहच्या भूमिकेला अपेक्षित वाव मिळणार नाही या विचाराने प्रभास संभ्रमित झाला. ‘बाहुबली’मुळे मिळालेली प्रसिद्धी आणि प्रेक्षकांसमोर निर्माण झालेला प्रभाव या भूमिकेमुळे थोडाफार कमी झाला असता म्हणून त्याने या भूमिकेस नकार दिला. अखेर प्रभासच्या जागी त्या भूमिकेसाठी शाहिद कपूरची वर्णी लागली.