बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा उद्या म्हणजे २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. सलमानच्या वाढदिवसाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच तो त्याचा ५४ वा वाढदिवस कसा आणि कुठे साजरा करणार या कडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्म हाऊसवर धूमधडाक्यात साजरा करतो. पण यंदा सलमान त्याचा वाढदिवस मुंबईमध्ये साजरा करणार असल्याचे म्हटले जात आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान त्याचा वाढदिवस भाऊ सोहेल खानच्या मुंबईमधील वांद्रे येथील घरी साजरा करणार आहे. सलमानची बहिण गर्भवती आहे आणि तिची सी-सेक्शन डिलीवरी २७ डिसेंबरला अपेक्षीत आहे. तसेच सलमनाने त्याचा वाढदिवस तिच्या मुलांसोबत साजरा करावा अशी अर्पिताची इच्छा आहे. त्यामुळे सलमान कुठेही न जाता त्याचा वाढदिवस घरीच साजरा करणार आहे.
सलमानच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, डेविड धवन, कतरिना कैफ, कबीर खान, प्रभुदेवा, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि जॅकलिन फर्नांडिस सलमानच्या घरी त्याला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत.