ते दिवस आता केव्हाच गेले जेव्हा टीव्हीला छोटा पडदा बोललं जायचं. आता हाच छोटा पडदा फार मोठा झाला आहे आणि बॉलिवूडला टक्करही देत आहे. आज फक्त मालिकांचे प्रोडक्शन बजेटच वाढले नाही तर, टीव्ही कलाकारांचे मानधनही वाढले आहे. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची काम करण्याची पद्धतही वेगळी असते. अनेक शिफ्ट्समध्ये त्यांना काम करावं लागतं. मालिकेमधील एक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनेक महिने, वर्षे लागतात. त्यामुळे दिव्यांका त्रिपाठी, राम कपूर, रॉनित रॉय आणि हिना खान यांसारख्या कलाकारांना ते सांगतील ते मानधन द्यायला निर्माते तयार असतात. चला तर मग कोणते टीव्ही कलाकार किती मानधन घेतात हे जाणून घेऊयात

दिव्यांका त्रिपाठी- ८०,००० ते १ लाख रुपये

‘ये है मोहब्बतें’ मालिकेत इशिताची व्यक्तिरेखा साकारणारी दिव्यांका टीव्ही जगतातली सर्वात आवडती सून आहे. तिने गेल्यावर्षी टीव्ही अभिनेता विवेक दहियासोबत लग्न केले. ती मालिकेच्या एका भागासाठी साधारणपणे ८०,००० ते १ लाख रुपये एवढं मानधन घेते.

हिना खान- १ लाख ते १.२५ लाख रुपये
स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अक्षराची व्यक्तिरेखा साकारणारी हिना खान १ लाख ते १.२५ लाख रुपये मानधन घेते. तिच्या अभिनयावर अनेकदा टीकाही केल्या गेल्या आहेत. तिचा अभिनय वैविध्यपूर्ण नसतो. कोणत्याही प्रसंगाला तिचे एकच हावभाव असतात. पण लोकांच्या या टीकेचा तिच्या मानधनावर फारसा फरक पडलेला दिसत नाही. कारण ही मालिका संपेपर्यंत सर्वात जास्त टीआरपी मिळवणारी ती मालिका होती. सध्या सर्वात जास्त मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

करण पटेल- १ लाख ते १.२५ लाख
‘ये है मोहब्बतें’ मालिकेत रमन भल्लाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या करणचे चाहतेही असंख्य आहेत. करण साधारणपणे १ लाख ते १.२५ लाख रुपये मानधन प्रत्येक भागासाठी घेतो.

अंकिता लोखंडे- ९०,००० ते १.५ लाख
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे सध्या छोट्या पडद्यापासून लांब आहे. पण पूर्वाश्रमिचा प्रियकर सुशांत सिंग राजपूत आणि इतर कारणांमुळे नेहमीच ती चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी अंकिता ९०,००० ते १.५ लाख मानधन आकारायची.

रोनित रॉय- १.२५ लाख
रोनित रॉय छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दोन्हीकडे सक्रीय आहे. बॉलिवूडमधून पदार्पण करणाऱ्या रोनितला आता टीव्हीचा अमिताभ बच्चनही म्हटले जाते. निर्माती एकता कपूरच्या आवडत्या कलाकारांच्या यादीमध्ये रोनितचे नावही सहभागी आहे. त्याचे काम करण्याचे स्वतःचे असे काही नियम आहेत. त्या नियमांनुसार तो महिन्यातून फक्त १५ दिवस काम करतो.

साक्षी तन्वर- ८०,००० रुपये
टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वरला खरी ओळख ‘कहानी घर घर की’ या मालिकेमुळे मिळाली. एकता कपूरच्या निकटवर्तीयांपैकी एक अशी साक्षीची ओळख आहे. आजही ती बालाजी टेलीफिल्म्ससोबत जोडली गेली आहे. नुकतीच ‘२४’ या मालिकेत ती दिसली होती. या मालिकेशिवाय साक्षी, आमिरच्या ‘दंगल’ सिनेमातही दिसली होती. ती प्रत्येक भागासाठी ८०,००० रुपयांचे मानधन घ्यायची.

राम कपूर- १.२५ लाख
टीव्ही अभिनेता राम कपूरची ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमुळे प्रसिद्ध झाला होता. या मालिकेत त्याच्यासोबत साक्षी तन्वरही होती. रामही एकता कपूरची आणखी एक आवडती व्यक्ती आहे. रोनित रॉयसारखे रामही महिन्यांतून १५ दिवसच काम करतो. उरलेले १५ दिवस तो सिनेमांसाठी किंवा कुटुंबाला देतो.

दृष्टी धामी- ६०,००० रुपये
टीव्ही जगतातली सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दृष्टी धामी. कलर्स वाहिनीवरील ‘एक था राजा एक थी रानी’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेच्या एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी दृष्टी ६०,००० रुपयांपर्यंत मानधन घेते.

मोहित रैना- १ लाख रुपये
‘देवों के देव महादेव’ या मालिकेत शंकराची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मोहित रैनाला प्रेक्षक आजही शंकर म्हणूनच ओळखतात. सध्या मोहित कलर्स टीव्हीवरील चक्रवर्ती ‘अशोक सम्राट’ या मालिकेत सम्राट अशोकची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेसाठी तो दिवसाला १ लाख रुपये घेतो.

शिवाजी साटम- १ लाख रुपये
सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘सीआयडी’मधील एसीपी प्रद्युम्नला कोण ओळखत नाहीत. ‘दया पता करो..’ हा संवाद ऐकला की आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर शिवाजी साटम यांचाच चेहरा येतो. गेल्या १८ वर्षांपासून ही मालिका अविरत सुरू आहे. या मालिकेसाठी साटम प्रत्येक भागासाठी १ लाख रुपये मानधन घेतात.