संगीतकार, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमियाचा २२ वर्षांचा संसार अखेर मोडला. मुंबई हायकोर्टाने हिमेश आणि त्याची पत्नी कोमल यांना घटस्फोट मंजूर केला. ‘आम्ही घटस्फोट घेतला असला तरी आम्ही एकमेकांचा नितांत आदर करतो, तसेच परस्पर संमतीनेच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आम्ही वेगळे झालो असलो तरी ती रेशमिया कुटुंबाची कायमच सदस्य राहील आणि मी कोमलच्या कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण भाग राहीन,’ असे हिमेशने सांगितले.
अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी
हिमेश आणि कोमल गेली २२ वर्ष एकमेकांसोबत संसार करत होते. पण अचानक या दोघांना आपण एकमेकांना अनुरुप नसल्याचे लक्षात आले आणि त्यांनी काडीमोड घेतला. या दोघांना स्वयम नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही कोमल, हिमेश ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीत राहणार असल्याचे समजते. पण याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
हिमेशच्या घटस्फोटाचे मुख्य कारण टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून हिमेशचे सोनियाशी नाव जोडले जातेय. २००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे अफेयर चर्चेत आले होते. पहिली चार वर्षे हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख फक्त एक ‘चांगली मैत्रिण’ अशीच करुन दिली होती. पण, या दोघांची वाढती सलगी मीडियापासून काही लपून राहिली नाही. कुटुंबियांच्या विरोधामुळे मग काही काळासाठी दोघांनी एकमेकांपासून अंतर राखून ठेवले. परंतु हिमेशच्या वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलला म्हणजेच हिमेशच्या पत्नीला याची पूर्ण कल्पना होती. तरीपण तिने कधीच त्याला उघडपणे विरोध केला नाही.
चाहत्यांना सल्ला देणं सलमानला पडलं महागात