‘इंडियन आयडल १२’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग शो आहे. ‘इंडियन आयडल १२’ सुरु झाल्यापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा शो चर्चेत असतो. या शोचा परीक्षक आणि प्रसिद्ध बॉलिवूड गायक हिमेश रेशमीया या शोचे स्पर्धक पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल यांना लॉन्च करणार आहे. हिमेश त्याच्या ‘मूड्स विथ मेलोडीज’ या अल्बमच्या पहिल्या गाण्यातून या दोघांना लॉन्च करणार आहे.

पवनदीप आणि अरुणिता दोघे ही या पर्वातील लोकप्रिय स्पर्धेक असल्यामुळे त्यांचे चाहते ही आनंदी झाले आहेत. या दोघांमध्ये दाखवण्यात आलेल्या लव्ह अँग्लमुळे ते सतत चर्चेत असतात. ‘सूरूर २०२१’ नंतर हिमेश रेशमियाने ‘मूड्स विथ मेलोडीज वॉल्यूम १’ या म्युझिकल अल्बमची घोषणा केली. हिमेश २१ जून रोजी जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पहिल्या गाण्याची रिलीज डेट जाहीर करेल. या गाण्यातून तो पवनदीप आणि अरुनिता एकत्र लॉन्च करणार आहे. पवनदीप आणि अरुनिता यांच्या आवाजांची स्तुती ही नेहमीच होतं असते.

आणखी वाचा : ‘अक्षयला गरीबांचा मिथुन चक्रवर्ती बोलायचे; माझ्या गाण्यांमुळे…’, अभिजीत भट्टाचार्य

हिमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या दोघांसोबत एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. “जागतिक संगीत दिन २१ जून रोजी मी माझ्या नवीन गाण्याच्या प्रदर्शणाच्या तारखेची घोषणा करणार आहे. हे गाणं गायक पवनदीप आणि अरुणिता यांनी गायलं आहे,” असे हिमेश म्हणाला.

हिमेश पुढे म्हणाला, “हे गाणं ‘मूड्स विथ मेलॉडीज’ या अल्बममधलं आहे, या अल्बमचं पहिलं गाणं मी संगीतबद्ध केले आहे आणि पवनदीप व अरुणिता यांनी गायले आहे आणि हे गाणं समीर अंजान यांनी लिहलं आहे. हे गाणं तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.  हे गाणं आता पर्यंतचं सगळ्या रोमॅन्टिक गाणं हे असेल. ”

आणखी वाचा : सलमान, अक्षय नंतर आता केआरकेचा विद्या बालनशी पंगा, म्हणाला..

दरम्यान, ‘इंडियन आयडल १२’ मध्ये हिमेश रेशमीयासोबत. नेहा कक्कड आणि विशाल दादली परीक्षक आहेत. सध्या अनु मलिक, सोनू कक्कर आणि मनोज मंतुशिर काही दिवसांपासून परीक्षकांची जागा सांभाळतं आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘इंडिय आयडच्या १२’ पर्वामुळे शो चा सुत्रसंचालक आदित्य नारायण बऱ्याच वेळा ट्रोल झाला आहे.

 

Story img Loader