करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी वैद्यकिय तज्ज्ञ आणि डॉक्टर्स मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. परंतु काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतायेत काही जण चुकीच्या पद्धतीने मास्क लावतायेत. अशा सर्व मंडळींना अभिनेत्री हिना खान मास्क लावण्याची योग्य पद्धत शिकवत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकाराची टीका
हिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळी ती करोना मास्कमुळे चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने मास्कचं महत्व समजाऊन सांगितलं आहे. शिवाय मास्क वापरण्याची योग्य पद्धतही तिने दाखवली आहे. तिच्या या महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या व्हिडीओवर काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अवश्य पाहा – ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहायचा का?’; ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला
View this post on Instagram
अवश्य पाहा – साडीमध्ये खुललं अमृताचं सौंदर्य; पाहा अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा
महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६ लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्त
महाराष्ट्रात करोना संसर्ग झालेले एकूण १६ लाख २३ हजार ५०३ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट आहा ९२.६४ टक्के इतका झाला आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार १२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज राज्यात २ हजार ८४० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये ६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.