हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता रुपेरी पडद्यावर अनुभवयाला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं. हे पोस्टर पाहिल्यानंतर नेमकी हिरकणीची भूमिका कोण साकारणार याकडे साऱ्याचं लक्ष वेधलं होतं. मात्र आता या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे.
‘हिरकणी’ या चित्रपटातील मुख्य पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून ‘नटरंग’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटामध्ये हिरकणीची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’चे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आलं.
आईच्या प्रेमाला शौर्याची जोड देणारी “हिरकणी”
#हिरकणी #lookreveal#Hirkani #24oct #1monthtogo@zee24taasnews @abpmajhatv @MiLOKMAT @LoksattaLive @mataonline @SakalMediaNews @timesofindia @JaiMaharashtraN @9XJhakaas @PuneTimesOnline @RajshriMarathi @boxofficeindia @ibnlokmattv1 pic.twitter.com/lB0aBgQXjG
— हिरकणी (@meSonalee) September 25, 2019
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील ‘हिरकणी’ला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. विशेष म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर यांनी मोशन पोस्टरला आवाज दिला आहे. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा उपस्थित होते.
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे आणि राजेश मापुस्कर या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे