हॉलिवूड अभिनेत्री गल गडोट बोल्ड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. वंडर वुमन गल गडोट नुकतीच तिसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यांनंतर लगेचच गल गडोट पुन्हा एकदा कामावर परतली आहे.

गल गडोटने सोशल मीडियावर नुकतेच दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती सेटवर ब्रेस्ट मिल्क पंप करताना दिसतेय. गल गडोट सेटवर बाथरोबमध्ये एका खुर्चीवर बसलेली दिसतेय. यात मेकपमन एकीकडे गल गडोटचा मेकअप करत आहेत. तर दुसरीकडे ती बाळासाठी पंपिगने दूध काढत आहे. हा फोटो शेअर करत गल गडोटने कॅप्शनमध्ये लिहिलं, “बॅकस्टेजच्या मागे, एक आई म्हणून”

हे देखील वाचा: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम, सत्य आलं समोर

 

View this post on Instagram

 

A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

हे देखील वाचा: ज्युनियर एनटीआररने खरेदी केली देशातील पहिली ‘लम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल’ कार; किंमत ऐकून डोळे चक्रावतील

या फोटोंमध्ये गल अत्यंत आनंदात दिसत आहे. कामावर परतल्यानंतरही ती तिच्या बाळाची काळजी घेत आहे. बाळासाठी ती एकीकडे ब्रेस्ट पंपिगच्या मदतीने दूधाची सोय करतेय. तर दुसरीकडे ती शूटिंगसाठी तयार होत आहे. त्यामुळे सध्या ती डबल ड्यूटी करत असल्याचं पाहायला मिळतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जून महिन्यातच गल गडोट तिसऱ्यांदा आई झाली आहे. या आधी तिला आलमा ही नऊ वर्षांची तर माया ही चार वर्षांची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक अभिनेत्रींनी स्तनपान आणि ब्रेस्ट पंपिंगफोटो शेअर करत या गोष्टींकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न केला आहे. यात आता गल गडोटचं नाव देखीस सामील झालंय.