टेलिव्हिनवर किंवा रुपेरी पडद्यावर भाऊ-बहिणीची, वहिनी-दीराची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले तरी भारतीय प्रेक्षकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरतो. पण, हॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर त्यांच्या आई-वडिलांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाच चक्क डेट केलेय. अशा इंटरनॅशनल सेलिब्रिटींवर एक नजर टाकूया.

नीना डोब्रेव या २८ वर्षीय अभिनेत्रीचे डेव्हीड अँडर्स या ३६ वर्षीय अभिनेत्यावर प्रेम जडले. डेव्हीड अँडर्स याने ‘द व्हॅम्पायर डायरीज’मध्ये अॅलेना गिल्बर्टच्या (नीना डोब्रेव) वडिलांची भूमिका साकारली होती. २०१३ मध्ये या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. त्यावेळी ते अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसायचे. फोटोंमध्ये दिसणाऱ्या त्यांच्या केमिस्ट्रीमुळी ही चर्चा सुरू झाली होती. मात्र डेव्हीडने निना ही त्याची केवळ चांगली मैत्रिण असल्याचे म्हटले होते.

nina-dobrev-david-anders

अभिनेता डवे एनॅबल (३७) त्याच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या ७० वर्षीय सॅली फील्डला डेट करत असल्याच्या काही वर्षांपूर्वी चर्चा होत्या. ‘ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स’ मध्ये सॅलीने एनॅबलच्या आईची भूमिका साकारली होती. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या २००७मध्ये बऱ्याच चर्चा रंगलेल्या. इतकंच नव्हे तर त्यांनी गुपचूप लग्न केल्याचेही म्हटले जाते.

dave-annable-sally-field

वाचा : आमिरचा लेटेस्ट फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल

‘डॉक्टर हू’ सिरीजमध्ये वडिलांची भूमिका साकारणारा अभिनेता डेव्हीड टेनेन्ट आणि यात त्याच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जॉर्जिया मॉफेट यांनी २००१मध्ये लग्न केलं.

david-tennant-and-georgia-moffett

अभिनेत्री कॅरी प्रेस्टन (वय ४९) हिने ‘द मॅन बिहाइंड द कर्टन’ मध्ये अभिनेता मायकल एमर्सनच्या (वय ६२) आईची भूमिका केली होती. या दोघांनी १९९८ मध्ये लग्न केलं.

michael-emerson-carrie-preston

वाचा : ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ म्हणणाऱ्या पाकिस्तानी समर्थकाला रितेशचे खणखणीत प्रत्युत्तर

अभिनेत्री जोएली रिचर्डसनने ‘निप/टक’ मध्ये अभिनेता जॉन हेन्सलेच्या आईची भूमिका साकारली होती. त्यादरम्यान या दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा होती. मात्र, या दोघांच्या ब्रेकअपचे मुख्य कारण काही समोर आले नाही. त्यांच्या वयामध्ये बरेच अंतर असल्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते.

john-hensley-joely-richardson

Story img Loader