‘आय रोबोट’, ‘हिच’, ‘आय अॅम लेजन्ड’ आणि ‘द पर्सू ऑफ हॅप्पीनेस’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या माध्यमातून हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने भारतीय प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या हा अभिनेता भारत दौऱ्यावर असून येथे येण्याची ही त्याची चौथी वेळ आहे. या दौऱ्यादरम्यान त्याने मुंबईलाही भेट दिली.

वाचा : वर्षाअखेर सलमानने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी

विल स्मिथने केवळ भारताची सफर केली नाही. तर त्याला येथील अनेक गोष्टीही भावल्या आहेत. त्याने चक्क भगवद् गीता वाचली आहे. विश्वास नाही बसत ना. पण, या हॉलिवूड अभिनेत्याने आतापर्यंत जवळपास ९० टक्के भगवद् गीता वाचली आहे. याविषयी विल म्हणाला की, ‘मी यापूर्वीही भारतात आलो आहे. या देशाचा इतिहास मला खूप आवडतो. जवळपास ९० टक्के भगवद् गीता मी आतापर्यंत वाचली असून, यामुळे माझ्यातील अर्जुनाला प्रेरणा मिळत आहे. पुढच्यावेळी मी ऋषिकेशला जाऊन तेथे बराच वेळ व्यथित करेन, असेही तो म्हणाला.’

वाचा : येसूबाई करणार शंभूराजांचं स्वागत

विल स्मिथ याआधी भारतात आला होता तेव्हा अभिनेता अक्षय कुमारने आपल्या घरी त्याच्यासाठी पार्टी दिली होती. ‘मला त्याच्या घरचे जेवण फार आवडले. मी यापूर्वी कधीच इतके स्वादिष्ट जेवण जेवलो नव्हतो’, असे विलने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.