‘आप की अदालत’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत हृतिक रोशनने आपल्याला कशाप्रकारे दगा दिला याचा खुलासा अभिनेत्री कंगना रणौतने केला. रजत शर्मा यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना ‘क्वीन’ कंगनाने तिच्या खासगी आयुष्यातील बरेच प्रसंग सर्वांसमोर मांडले. हृतिकने आता पुन्हा एकदा एका व्यक्तीला दगा दिला आहे.

निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांना हृतिकने दगा दिला आहे. आपल्या आगामी ‘कबड्डी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी या दोघांनी हृतिकची निवड केली होती. पटकथा वाचल्यानंतर त्याने होकारसुद्धा दिला होता. मात्र आता अचानक हृतिकने हा चित्रपट नाकारल्याचं वृत्त ‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटने दिलं आहे.

Article about avoid exam result stress
ताणाची उलघड: निकालाचा तणाव टाळण्यासाठी…
uddhav thackeray extremely depressed says minister shambhuraj desai zws
उद्धव ठाकरेंना लोकांचा प्रतिसाद नसल्याने त्यांच्यात मोठे नैराश्य; मंत्री शंभूराज देसाई यांचे टीकास्त्र
Voter Sympathy, Voter Sympath gain crowd in public meeting, Chhagan Bhujbal, sharad pawar, Chhagan Bhujbal said Voter Sympathy will not win Election, nashik lok sabha seat, lok sabha 2024, elction campaign, mahayuti seat allocation,
सहानुभूतीमुळे शरद पवार यांच्या सभांना गर्दी – छगन भुजबळ यांचे मत
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Ronnie Screwvala and Rakeysh Omprakash Mehra
निर्माते रोनी स्क्रूवाला, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा

वाचा : सोहा- कुणालच्या घरी आली नन्ही परी

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘कबड्डी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होतं मात्र आता त्याच वेळी हृतिक ‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत निर्मित होणाऱ्या चित्रपटात काम करणार आहे. ”कबड्डी’च्या पटकथेत काही बदल केल्यास मी त्यात भूमिका साकारण्याचा विचार करेन,’ असंही त्याने राकेश ओमप्रकाश मेहरा आणि रॉनी स्क्रूवाला यांना सांगितलं. अद्याप यावर दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता हृतिकसाठी चित्रपटाच्या पटकथेत बदल करण्यात येणार की दुसऱ्या अभिनेत्याचा शोध सुरु करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.