कंगना आणि तिची बहीण गेल्या काही दिवासांपासून अभिनेता हृतिक रोशनवर बरेच आरोप करत आहेत. कंगना आणि हृतिकच्या बहुचर्चित रिलेशनशिपविषयीही बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे. दोघांच्या वादासंदर्भातील नवनवीन गोष्टी, नवनवीन घडामोडी दररोज ऐकायला मिळत आहेत. सुरुवातीला कंगनाने हृतिकवर आरोप केले. त्यानंतर हृतिकनेही आपले मौन सोडत तिला प्रत्युत्तर दिले. यादरम्यान, सद्य घडामोडींवर कार्टूनच्या माध्यामातून जाहिरात करणाऱ्या अमूलने कंगना – हृतिक प्रकरणाची एकप्रकारे खिल्ली उडवली होती. यावर हृतिकने एका मुलाखतीत भाष्य केले. दोन वर्षांपूर्वीच या दोघांमधील वादाला नुकतेच कुठे तोंड फुटलेले असतानाच अमूलने असे विनोद करण्यास सुरुवात केल्याचे हृतिकने म्हटले.

वाचा : ‘पद्मावती’च्या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादाने भारावलेल्या रणवीरने लिहिली भावूक पोस्ट

‘सीएनएन आयबीएन’ला दिलेल्या मुलाखतीत अमूलच्या विनोदी जाहिरातीबद्दल हृतिक म्हणाला की, मी निर्माण केलेला ‘क्रिश’ हा ब्रॅण्ड माझ्या बाळासारखा आहे आणि त्यावरनच अमूलने विनोदी जाहिरात केल्याचे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. एका झटक्यात तो ब्रॅण्ड उध्वस्त झाला. चीज किंवा कशाचीतरी चोरी केल्यामुळे क्रिश पळ काढतोय अशा आशयाची ती जाहिरात होती. पण हे काही बरोबर घडत नसल्याची जाणीव मला त्या दिवशी झाली. मागे वळून पाहिल्यानंतर माझ्या पहिल्या ‘कहो ना प्यार है’ चित्रपटाच्या यशानंतर याच अमूलने माझी प्रशंसा केल्याचेही आठवते. एकीकडे माझी स्तुती करणाऱ्या आणि दुसरीकडे माझी खिल्ली उडवणाऱ्या अशा जाहिरातींपासून दूर राहण्यासाठी मला स्वतःचा मार्ग शोधण्याची गरज आहे. जगातील कोणत्याही धारणेविरोधात मी लढू शकेन इतके मला बलवान व्हायचे आहे. लोक आपल्याबद्दल काय बोलतात यावरून आपण स्वतःची ओळख तयार करतो. तुम्ही सक्षम आहात असे तुमचे आई-वडील तुम्हाला सतत म्हणत असतात. हा एक माझ्यासाठी विलक्षण धडा होता. लोक माझ्यावर करण्यात आलेली विनोदी जाहिरात पाहून माझे परीक्षण करत असतानाही मी अजूनही लोकांना हसवतोय, अजूनही लोकांसाठी सक्षमपणे योगदान करतोय, सकारत्मकतेचा प्रसार करतोय. हे सर्वकाही माझ्यासाठी सोपं नाही.

वाचा : …अन् चिडलेल्या अनुरागने चाहत्याला सुनावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सिमरन’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांवेळी कंगनाने अनेक मुलाखती दिल्या. त्यावेळी अमूलने तिच्यावरही कार्टून तयार केले होते.