बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची लहान मुलेही आता अनेकांची लक्ष वेधू लागली आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याचा कान चित्रपट महोत्सवातील स्टायलिश अंदाज, करिना कपूर खानचा चिमुकल्या तैमूरचा गोंडसपणा, शाहिद कपूरची मुलगी मिशाचा टाळी वाजवतानाचा व्हिडिओ आणि सर्वांचच लक्ष वेधून घेणारा शाहरूख खानचा मुलगा अबराम. दिग्गज कलाकारांच्या या मुलांनी चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.

या यादीत समाविष्ट होणारी पुढील नावे म्हणजे हृतिक रोशनची मुलं ह्रिहान आणि ऱ्हिदान. हृतिकने बुधवारी आपल्या मुलांसोबत वेळ घालवतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ह्रिहान आणि ऱ्हिदान काही संवाद साधताना दिसत आहेत आणि यावेळी हृतिकच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्यचकित झाल्याचे हावभाव दिसत आहेत. पण असं काय झालं की ज्यामुळे हृतिक इतका आश्चर्यचकित झाला? खरं तर या दोघा चिमुकल्या भावांपैकी एकाने दुसऱ्याला वडील एका गोष्टीसाठी मान्य झाले असल्याचे सांगितले ज्याबद्दल हृतिकला काही कल्पनाच नव्हती. ‘तो- …काळजी करू नकोस, बाबांची त्या गोष्टीला काही हरकत नाही असं ते स्वत: म्हणाले’, ‘मी- काय?’ असं हृतिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

 

priyanka-hrithik

 

वाचा : ‘या’ अभिनेत्रीसाठी सलमान बनला हिंदी शिक्षक

हृतिकच्या या पोस्टवर प्रियांका चोप्रानेही ‘LOL’ अशी कमेंट केली आहे. पत्नी सुझान खानसोबत विभक्त झाल्यानंतर ह्रिहान आणि ऱ्हिदान दोघेही हृतिकसोबत राहतात. हृतिक आणि सुझान विभक्त झाले असले तरी दोघे पाल्याची भूमिका योग्यरित्या बजावताना आपल्याला दिसतात. आपल्या व्यस्त कामकाजातूनही मुलांना वेळ देण्यासाठी हृतिक चुकत नाही. अभिनयाप्रमाणेच एक पिता म्हणूनही आपली भूमिका योग्यरित्या बजावत असल्याचे चित्र या पोस्टमधून स्पष्ट होताना दिसत आहे.