बॉलिवूड अभिनेता हृतिक त्याच्या अभिनयासोबतच डान्स कौशल्यासाठी विशेष ओळखला जातो. त्याच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. हृतिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ गायक मिका सिंगने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ नवीन वर्षाच्या पार्टीतला आहे. या व्हिडीओमध्ये हृतिक फक्त डान्स करत नाही तर त्याची सुपरहिट गाणी सुद्धा गुणगुणत आहे. ‘कहो ना…प्यार है’ आणि ‘एक पल का जीना’ ही गाणी हृतिक गुणगुणत आहे. मिका गिटार वाजवत गाणी गात आहे. “हृतिक, राकेश रोशन, तुमचे खूप खूप आभार. एवढ्या चांगल्या पार्टीचे आयोजन केल्याबद्दल. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुडबाय २०२०, २०२१चे स्वागत आहे!” अशा आशयाचं कॅप्शन लिहित मिकाने तो व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा : शूटदरम्यान सनीने खरोखरंच आवळला होता अनिल कपूर यांचा गळा; ‘या’ गोष्टीमुळे होता संतप्त

‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या चित्रिकरणाला हृतिक लवकरच सुरूवात करणार याहे. यासोबत हृतिक दक्षिणात्य चित्रपट विक्रम वेधा या चित्रपटाच्या हिंदी रिमेक मध्ये दिसणार आहे.