करोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातला आहे. या महामारीचा फटका सामान्य जनतेपासून ते बॉलिवूडमधील अनेक कलाकरांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे अनेक कलाकारांचे मोठे नुकसान झाले. अनेक कलाकारांसोबतच तंत्रज्ञांना काम न मिळाल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. आता अभिनेते कमल हासन यांची मुलगी श्रुती हासनला देखील आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे समोर आले आहे.

श्रुतीने नुकताच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले आहे. ‘मला हे सर्वांपासून लपवण्याची इच्छा नाही आणि ही महामारी जाण्याची मी वाट पाहू शकत नाही. शूटिंग करताना सेटवर मास्क न लावल्यामुळे थोडी भीती वाटते. पण पुन्हा लवकरच काम सुरु करावे लागेल. कारण इतरांप्रमाणेच मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जेव्हा शूटिंग सुरु होईल तेव्हा मला बाहेर पडून शूटिंग पूर्ण करावेच लागेल. माझ्यासुद्धा काही मर्यादा आहेत. मी माझ्या आई-वडिलांची मदत घेऊ शकत नाही’ असे श्रुती म्हणाली.

आणखी वाचा : ‘रक्तदान करताना मास्क लावण्याची परवानगी नाही’, ट्रोल करणाऱ्यांना सोनू निगमचे उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

पुढे श्रुती म्हणाली, ‘प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमावत असतो. पण प्रत्येकाला बिल तर भरावेच लागतात. त्यासाठी मला पुन्हा कामावर जाणे गरजेचे आहे.’ श्रुती गेल्या ११ वर्षांपासून एकटी राहत आहे. तिने लॉकडाउनपूर्वीच स्वत:साठी नवे घर खरेदी केले आहे. त्यामुळे आता तिला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉकडाउनपूर्वी श्रुती एक वेब सीरिज आणि एका चित्रपटासाठी काम करत होती. या चित्रपटाचे नाव ‘सालार’ आहे. या चित्रपटात श्रुती अभिनेता प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.