अभिनेता सुशांत सिंह राजपूत सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामांत बराच व्यस्त आहे. नुकतेच त्याने सारा अली खानचा बॉलिवूडमधील पदार्पण असलेल्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. त्याचसोबत तो जॅकलिन फर्नांडिससोबत ‘ड्राइव्ह’ चित्रपटातही काम करतोय. यातीलच एका गाण्याच्या कामातून त्याने स्वतःसाठी वेळ काढला आहे. ‘दोस्ताना’चा दिग्दर्शक तरुण मनसुखानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, करण जोहरच्या बॅनरअंतर्गत याची निर्मिती करण्यात येईल.

अॅक्शन थ्रिलरपट असेल्या ‘ड्राइव्ह’मध्ये सुशांत न्यूड दृश्य देणार असल्याची सध्या चर्चा आहे. या दृश्यावरून काही वाद सुरु असून, त्याविषयी सुशांतला विचारले असता तो म्हणाला की, मला याबाबत अजिबात संकोच वाटत नाहीये. तुम्हाला खात्री पटवून देण्यासाठी मी काही करण्याची गरज असेल तर त्यासाठी मी तयार आहे. यासाठी मला पैसे मिळत आहेत.

वाचा : सगळ्यांपासून दूर जाणार तैमुर; मनोरंजन क्षेत्रातील १० ठळक घडामोडी

माझ्यासाठी हे सोयीस्कर का असू नये? मुळात मी याबद्दल का विचार करु? एखाद्या दृश्यात मला रडण्यास सांगितले तर मी तेव्हा खरोखरच रडत असतो. खरंतर रडणं हे माझ्यासाठी सोयीस्कर नाही. कारण, मुळातच मी भावनांपासून दूर राहणारा व्यक्ती असल्यामुळे मला रडू येत नाही. पण, चित्रपटात जेव्हा रडण्याचे दृश्य येते तेव्हा माझ्या मनातही त्याच भावना येतात. त्या भावना एकरूप झाल्यानंतर माझ्या डोळ्यांतून आपोआप अश्रू ओघळतात. एखादी भूमिका चौकटी पलीकडे असल्यास अनेकदा कलाकारांना काम करणे सोयीस्कर होत नाही, असेही सुशांत म्हणाला.

वाचा : नागार्जुनच्या सुनेबद्दल या गोष्टी माहितीहेत का?

चित्रपटातील सुशांतचे न्यूड दृश्य हे कथेचा महत्त्वपूर्ण भाग असल्याची कबुली देत सुशांत म्हणाला की, बॉलिवूडमध्ये याआधीही अभिनेत्यांनी अशी दृश्यं दिली आहेत. जॉन अब्राहमने ‘दोस्ताना’मध्ये सेमी न्यूड आणि ‘न्यूयॉर्क’मध्ये पूर्ण न्यूड दृश्य दिलेय. राजकुमार रावने ‘शाहिद’ चित्रपटातील एका दृश्यासाठी न्यूड होणे स्वीकारले. ‘बेफिक्रे’साठी रणवीर सिंगने त्याची पाठमोरी बाजू दाखविली. आता तुम्ही माझ्याबद्दल विचारत असाल तर, मला मोठ्या पडद्यावर न्यूड होण्यास काहीच संकोच नाही. मात्र, तशी भूमिकेची गरज असायला हवी.

Story img Loader