क्रिकेटच्या पंढरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्याप्रमाणे दमदार खेळी दाखवत भारतीय संघ या सामन्यात इतिहास रचणार का? याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. प्रत्येक भारतीय आपआपल्या परिने महिला खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. यात आता बॉलिवूडकर तरी कसे मागे राहतील. या सामन्याकडे फक्त सर्वसामान्य प्रेक्षकांचेच नाही तर बॉलिवूडचेही लक्ष लागून राहिले आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेकांनी आपल्या शुभेच्छा भारतीय महिला क्रिकेट संघासोबत असल्याचे सांगितले. मिथाली राजच्या या टीमकडे आज साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

Video: ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा हा व्हिडिओ पाहिलात का?

सध्या शाहरुख लॉस एन्जेलिसमध्ये असून त्याने ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विटरवर लिहिले की,’ तुम्ही आमची मान गर्वाने उंचावली आहे. आजच्या सामन्यासाठी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा. माझे प्रेम तुमच्यासोबत सदैवर आहे.’

अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लंडनला गेला आहे. त्याने टीम इंडियाला शुभेच्छा देत ट्विटरवर लिहिले की, ‘भारतीयांनो आज तुमचा पाठींबा टीम इंडियाला हवा आहे.’ त्याने नुकतेच ट्विटरवरून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या नाहीत तर आयुष्यात पहिल्यांदा त्याने अनवाणी धावत ट्रेन पकडली. त्याला वेळेत हा सामना बघायला जायचे होते. जर त्याची ठरलेली ट्रेन चुकली असती तर त्याला कदाचित त्याला या सामन्याला मुकावे लागले असते. म्हणून टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाचे प्रमोशन संपताच तो धावत या सामन्यासाठी निघाला. तिथे पोहचल्यावर त्याने खेळाडूंना प्रोत्साहन देणारे ट्विटही केले.

https://twitter.com/akshaykumar/status/889126341991432193

अनुष्का शर्मानेही ट्विटरवरुन भारतीय महिला खेळाडूंना पाठिंबा देत म्हटले की, ‘अंतिम सामन्यासाठी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा आणि आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल तुमचे अभिनंदन.’ आता अनुष्काने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तर इतर अभिनेत्री थोडीच मागे राहणार. सोनाक्षी सिन्हाने ट्विटरवर फक्त लिहून शुभेच्छा दिल्या नाहीत तर तिने स्वतःचा एक व्हिडिओही शेअर केला. ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुन्हा एकदा वर्ल्ड कप घरी आणण्याची हीच वेळ आहे. उत्कृष्ट खेळ खेळून तुम्ही वर्ल्ड कप घरी आणा.’

https://twitter.com/sonakshisinha/status/888994050422050820

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरुण धवन आणि तापसी पन्नूनेही व्हिडिओ शूट करून भारतीय महिला खेळाडूंना आजच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. या कलाकारांशिवाय श्रद्धा कपूर, समंथा रुथ प्रभू, राहुल बोस आणि अन्य कलाकारांनीही ट्विटरवरुन भरभरून शुभेच्छा दिल्या.