न्यूयॉर्कमध्ये आयफा २०१७ चा जलवा तिथल्या प्रेक्षकांनी अनुभवला. बॉलिवूडच्या कलाकारांनी ग्रीन कार्पेटवर एकच जल्लोष केला. या कलाकारांच्या मांदियाळीत खरं सरप्राईज तर कतरिना कैफने दिलं. या पुरस्कार सोहळ्यात तिचा एक खास डान्स परफॉर्मन्स होता. पण तो नेमकी कशावर आहे याची कल्पना कोणालाच नव्हती. तिचा हा परफॉर्मन्स खास ऐश्वर्या राय बच्चनसाठी होता. तिने तिच्या डान्समधून ऐश्वर्याला अनोखी मानवंदनाच दिली.
या पुरस्कार सोहळ्यावेळी सुमारे ८०,००० प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. यावेळी कतरिनाने ऐश्वर्याच्या ताल आणि धूम या सिनेमातील गाण्यावर नृत्य केले. गेल्या कित्येक दिवसांपासून ती या गाण्यांचा सराव करत होती. रणबीर कपूरसोबतच्या जग्गा जासूस या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असूनही तिने या डान्स परफॉर्मन्ससाठी वेळात वेळ काढला होता.
https://twitter.com/jinnions/status/886464897675968515
आयफा २०१७ हा अजून एका कारणासाठी खास ठरला ते कारण म्हणजे सलमान खान आणि कतरिनाची केमिस्ट्री. या संपूर्ण सोहळ्यात ते एकमेकांसोबत खुलेपणाने वावरताना दिसले. आश्चर्य म्हणजे ऐश्वर्या आणि कतरिना या दोघीही सलमानच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसी आहेत. असे असूनही तिने ऐश्वर्याला नृत्याच्या माध्यमातून मानवंदना दिली हे पाहून उपस्थितांच्या भूवया किंचीतशा वर झाल्या.
#KatrinaKaif will set the #IIFA2017 stage on fire tonight at 7:00 pm. pic.twitter.com/QOWTRwn1EH
— ColorsTV (@ColorsTV) July 16, 2017
कामाच्या ठिकाणी एकमेकांमधील वैयक्तिक वाद सोडून जेव्हा ही मंडळी एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. कतरिनाच्या डान्सचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. कतरिनाने ऐश्वर्याच्या गाण्यांसह तिच्या अफगाण जलेबी, गलती से मिस्टेक आणि काला चश्मा यावरही डान्स केला.
https://twitter.com/jinnions/status/886461232508657668
कतरिनासोबतच सलमान खान, आलिया भट्ट, शाहिद कपूर, वरुण धवन, सुशांत सिंग राजपुत आणि क्रिती सेनन यांनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स दिले.