सध्या भारतात पावसाळी वातावरण असले तरी न्यूजर्सीमध्येही काहीसे तसेच आहे. वरुण राजा तिथे ऐनवेळी प्रसन्न झाला पण शो मस्ट गो ऑन या नियमाला लागून शो सुरुच राहिला. एआर रेहमानने इथे लाइव्ह परफॉर्मन्सही दिला. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर येणाऱ्या कलाकारांची नेहमीच चर्चा होते.

यावेळीही सर्व स्टार मंडळी ग्रीन कार्पेटवर जाण्यासाठी सज्ज झाले असताना वरुण राजाही प्रसन्न झाले. अचानक पाऊल पडू लागल्यामुळे हा सोहळा फिका पडणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण सलमान खान, आलिया भट्ट, कतरिना कैफ, शाहिद कपूर, अनुपम खेर, सैफ अली खान, हुमा कुरेशी, रिचा चड्ढा, तापसी पन्नू, शबाना आझमी, सोनू सूड आणि दिया मिर्झा या कलाकारांनी ग्रीन कार्पेट सोहळ्याला चार चाँदच लावले.

alia-bhatt2

अचानक आलेल्या पावसामुळे इतर कलाकारांचा थोडा हिडमोड झाला असला तरी सलमान खान मात्र चांगलाच खुश होता. त्याने ट्विटवर आपलं मत मांडत म्हटले की, ‘न्यू यॉर्कमध्ये मस्त पाऊस सुरू आहे. हे वातावरण मला आवडतं. जर उद्याही असाच पाऊस पडला तर पावसात नाचण्याचा आनंदच काही वेगळा असेल.’ यंदाच्या आयफा सोहळ्याचा स्टार परफॉर्मर म्हणून सलमानकडे पाहिले जात आहे.

salman-khan1

तर दुसरीकडे शाहिद कपूरही पावसामुळे आनंदी दिसला. ‘आयफा रॉक्स पावसामुळे पार्टी थांबू शकत नाही, असं ट्विट त्याने केलं.’

shahid-kapoor4

katrina-kaif7

एआर रेहमाननेही खास पद्धतीने पावसाचे स्वागत केले. त्याच्या एकाहून एक सरस गाण्यांमुळे पावसाची मजा येणार नाही तर नवलच. रेहमानच्या साथीला जर हरिहरन, कैलाश खेर, जोनिता गांधी आणि मोहित चौहान असतील तर मग ते वातावरण मंत्रमुग्ध होणार नाही तर नवलच.

saif-ali-khan-at-iifa-rocks