दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपलं स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेत्री इलियाना डिक्रूझ बॉलिवूडकडे वळली. बॉलिवूडमधील सहा वर्षांच्या करिअरमध्येही तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘बर्फी’, ‘हॅपी एन्डिंग’, ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या इलियानाने करिअरशी समाधानी नसल्याचं स्पष्ट केलं. किंबहुना चित्रपटसृष्टीत कराव्या लागणाऱ्या संघर्षापेक्षा वैयक्तिक प्रश्नांचा सामना करणं कठीण असल्याचं तिने म्हटलं आहे.

इलियानाचा ‘रेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये ती अजय देवगणसोबत झळकली. चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इलियानाने करिअरविषयी असलेली भिती व्यक्त केली. ‘दररोज नवनवीन कलाकारांची भर पडत असलेल्या आणि अत्यंत स्पर्धात्मक असलेल्या या चित्रपटसृष्टीत तुम्ही कधीच समाधानी नसता. दर शुक्रवारी कलाकारांची परीक्षा असते. इतरांना मिळणाऱ्या भूमिका पाहून माझा स्वत:विषयीचा न्यूनगंड वाढतच जातो,’ असं ती म्हणाली.

वाचा : ‘या’ अभिनेत्याने नाकारलेल्या ‘बँड बाजा बारात’मुळे रणवीरला मिळाली नवी ओळख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करिअरपेक्षाही वैयक्तिक समस्यांना सामोरं जाणं हाच मोठा प्रश्न सध्या इलियानासमोर आहे. याविषयी ती म्हणाली की, ‘माझ्या काही शारीरिक आणि मानसिक अडचणी आहेत. कामातून थोडा वेळ काढून त्यावर अधिक लक्ष देणं माझ्यासाठी सध्या गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे.’ तर याआधी दिलेल्या एका मुलाखतीत तीने तिच्या नैराश्याबद्दलही स्पष्ट केलं होतं. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच आत्मविश्वास राहिला नसून मी बराच काळ नैराश्यात होते, असं तिने म्हटलं होतं.