क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणारा विराट कोहली आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा बहुचर्चित विवाहसोहळा नुकताच पार पडला. विरुष्काच्या वेडिंग डेस्टिनेशनपासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. यातच या दोघांनी हनिमूनचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आणि ही जोडी हनिमूनला कुठे गेली यावर तर्क लढवले जाऊ लागले. अखेर ही जोडी नेमकी कुठे हनिमूनला गेली याचा उलगडा झाला आहे.

विराट आणि अनुष्का त्यांच्या हनिमूनसाठी दक्षिण आफ्रिकेत गेल्याचे म्हटले गेले, तर कोणी म्हटले, ते रोममध्ये गेले आहेत. पण, ते रोममध्ये नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ‘इंडिया टुडे’ने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा विचार केला तर सध्या रोममध्ये साधारण १४ अंश सेल्शिअस पर्यंतचे तापमान असू शकते. त्यामुळे हा फोटो आणि त्यात दिसणारा बर्फाच्छादित प्रदेश पाहता हे ठिकाण रोम नाही, हे जवळपास नक्की झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या फोटोमध्ये विराटच्या डोक्यावर जी लोकरीची टोपी आहे, त्यावर ‘लक्झरी अॅक्शन’ असे नाव लिहिण्यात आले आहे.

वाचा : अबब! विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लक्झरी अॅक्शन’ ही फिनलँडमधील एक प्रसिद्ध पर्यटन संस्था आहे. सध्याच्या घडीला फिनलँडमधील वातावरणाविषयी इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार त्या ठिकाणचा पारा उणे १ ते ३ अंश सेल्शिअसवर उतरला असल्याची चिन्हे आहेत. फिनलँडमध्ये ‘विरुष्का’ला पाहण्यात आले असून, काही चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. पण, त्या दोघांनीही चाहत्यांसोबत फोटो काढण्यास नकार दिला. त्यामुळे आपण, असलेल्या ठिकाणी पुन्हा माध्यमांची गर्दी आणि चर्चा होऊ नयेत, यासाठीच त्यांनी ही भूमिका घेतली असावी असे म्हणायला हरकत नाही.