मॉडेल सोफिया हयात ही गेल्या वर्षी नन बनल्यापासून स्वतःला गया सोफिया मदर असे समजते. आपण शिवाला जन्म दिला आहे असे सांगणाऱ्या सोफियाने भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू रोहित शर्माला Rohit Sharma ट्विटरवर ब्लॉक केले आहे. मॉडेल आणि अभिनेत्री सोफियाने गेल्या आठवड्यात रोहितला ब्लॉक केल्याचे ट्विटरवरून सांगितले आहे.
वाचा : ४४ वर्षांचा अनुराग कश्यप २३ वर्षांच्या मुलीला करतोय डेट
सोफियाने Sofia Hayat रोहितला ब्लॉक केल्याचा स्क्रिनशॉट शेअर करत लिहिले की, शेवटी मला त्याला ब्लॉक करावे लागले. २०१२ साली सोफियाने ती रोहितला डेट करत असल्याचे म्हटले होते. पण, त्यानंतर लेगच तिने मी एका जेन्टलमॅनच्या शोधात असल्याचे सांगत स्वतःच या नात्यातून निघण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केलेले.
So I had to block him in the end.. pic.twitter.com/Vg9sL6wxxW
— Sofia Maria Hayat (@sofiahayat) June 6, 2017
लोकांचे लक्ष वेधण्यासाठी अनेक शक्कल लढविणाऱ्या सोफियाने या वर्षी एप्रिल महिन्यात व्लाद स्टानेस्कु याच्याशी लग्न केले. इजिप्शियन पद्धतीनुसार पार पडलेल्या या लग्नाचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते. लग्नाच्या जवळपास दीड-दोन महिन्यांपूर्वी आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हणत सोफियाने तिच्या जोडीदारासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
Ok let's put the rumours to end..yes I dated rohit sharma.. now it's over.. I wouldn't date him again..this time I'm looking for a gentleman
— Sofia Maria Hayat (@sofiahayat) October 28, 2012
दरम्यान, रोहित शर्मा सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ICC Champions ट्रॉफीसाठी गेला आहे. रोहितने रितिका सजदेह हिच्याशी लग्न केलेय. आज भारतीय संघाची बांग्लादेशच्या संघाशी लढत होणार आहे.