टेलिव्हिजनवरील सध्या चर्चेत असलेला शो ‘इंडियन आयडल १२’ चा सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवालला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. करोनातून बरा होत असतानाच आदित्य नारायणचं वजन प्रचंड वाढलं होतं. मात्र आदित्यने मोठी मेहनत घेत अगदी कमी काळात वजन नियंत्रणात आणलं आहे. आदित्य नारायणचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरीदेखील थक्क झाले आहेत.

करोनातून बरा झाल्यानंतर आदित्यने अवघ्या दोन महिन्यात हे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं आहे. आदित्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत आदित्यचं वाढलेलं वजन पाहायला मिळतंय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणालाय, “१५ एप्रिल जेव्हा माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली.”

Fifty eight people died in horrific accident at Kanhan railway crossing near Nagpur 20 years ago
२० वर्षांपूर्वीच्या भीषण रेल्वे अपघाताचे स्मरण, काय घडले होते?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
MNS workers beat up bullet drivers who made noise in Nigadi pune news
MNS News: पुण्यात मनसेचा बुलेट चालकाला चोप, कर्णकर्कश्य आवाजाच्या सायलेन्सर त्रासाविरोधात धडक कारवाई
While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
Ganga River Varanasi
Varanasi News : गंगा नदीवर दोन बोटींची टक्कर झाल्याने एक बोट बुडाली, एनडीआरएफच्या तत्परतेमुळे १८ प्रवासी सुखरुप!

हे देखील वाचा: Happy Birthday Mithun Chakraborty: ‘त्या’ घटनेमुळे नक्षलवाद सोडून अभिनय क्षेत्राकडे वळाले मिथुन चक्रवर्ती

तर आदित्यने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत मोठा बदल जाणवतोय. यात त्याचं कमी झालेलं वजन स्पष्ट दिसतंय. आदित्य त्याची फिट बॉडी या फोटोत फ्लॉन्ट करताना दिसून येतोय. आदित्यचा दुसरा फोटो १५ जूनचा आहे. आदित्यच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांनी तसचं अनेक सेलिब्रिटींनी मोठी पसंती दिलीय. तसंच आदित्यच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं अनेकांनी कौतुक केलंय. अभिनेता विक्रांत मेस्सीने आदित्यच्या फोटोवर हटके कमेंट केलीय. “व्वा..नानू हलवाई ते नानू जलवाई” अशी कमेंट विक्रांतने केली आहे.

हे देखील वाचा: मड बाथसाठी मोजले तब्बल २० हजार, उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

आदित्य आणि त्याची पत्नी दोघांनाही करोनाची लागण झाली होती. यावेळी आदित्यची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांनंतर आदित्यची तब्येत सुधारली. आदित्य इंडियन आयडल शोमध्ये पुन्हा परतला आहे.

Story img Loader