छोट्या पदड्यावरील गाजलेला शो ‘इंडियन आयडल’मध्ये सध्या फिनालेचे वेध लागले आहेत. या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आजवर हजेरी लावत स्पर्धकांना प्रोत्साहन दिलंय. यंदाच्या एपिसोडमध्ये बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने खास हजेरी लावली आहे. करणने स्पर्धकांसोबत हा एपिसोड चांगलाच एन्जॉय केला. मात्र या एपिसोडमध्ये एक क्षण असा आला की करण भावूक झाला आणि त्याला अश्रू आवरणं कठीण झालं.

या शो दरम्यान करण जोहरच्या आई हिरू जोहर यांनी करणसाठी एक खास व्हिडीओ मेसेज पाठवला होता. या व्हिडीओत त्यांनी करणच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. आपल्या मुलाने अनेक दिग्दर्शकांना आणि कलाकारांना घडवलं आणि त्याचा अभिमान असल्याचं हिरू जोहर म्हणाल्या. यावेळी करण सारखा मुलगा असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते असंही त्या म्हणाल्या. आईचे हे शब्द ऐकून करण भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले.

हे देखील वाचा: महाराष्ट्रातील शाळांमधून खेळाडू घडवा; नीरजच्या यशानंतर मराठी अभिनेत्याची इच्छा

यावेळी करण म्हणाला, “मी माझ्या आईच्या तोंडून जेव्हा स्वत:बद्दल काही ऐकतो तेव्हा नेहमी भावूक होतो. असं म्हणतात तुमचे पालक तुमच्यापासून दूर गेले तरी तुमच्या सोबत देव कायम असतो. मी माझ्या वडिलांकडे नेहमी एकच प्रार्थना करतो की त्यांचा आशिर्वाद आमच्यावर कायम रहावा.” असं करण म्हणाला.

इंडियन आयडलचा हा खास एपिसोड १५ ऑगस्टला प्रसारित होणार आहे. या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी दमदार परफॉर्मन्स सादर करत करण जोहरचं मनं जिंकलं आहे.

Story img Loader