बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने काल त्याचा ५२वा वाढदिवस साजरा केला. आपल्या ‘बेस्ट फ्रेंड’च्या वाढदिवसासाठी दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने खास बेत आखला होता. सोनाक्षी सिन्हा, रवीना टंडन, आदिती राव हैद्री, तुषार कपूर आणि सोफी चौधरी यांच्यासह करण थेट मनिषच्या घरी अचानक पोहोचला आणि त्याला आश्चर्याचा धक्का दिला. मनिषने त्याच्या या ‘सरप्राइज बर्थडे पार्टी’चे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

TOP 10 NEWS वाचा : विरुष्काच्या लग्नाच्या बातमीपासून माहेरच्या साडीपर्यंत..

या फोटोंमध्ये मनिष हा करण, रवीना सोनाक्षी आणि भाचा पुनित मल्होत्रासोबत दिसतो. पुनितने ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. हे फोटो शेअर करत मनिषने लिहिलं की, सुंदर सरप्राइजसाठी सर्वांचे आभार. माझा दिवस तुम्ही अधिक खास केलात. आपला हा दिवस अधिक विशेष करणाऱ्या व्यक्तींनाही त्याने या फोटोत टॅग केले.

वाचा : राज- नानांच्या वादात मकरंद यांचे मौन

याआधी करणने मनिषसोबतचा फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. माझा जवळचा मित्र आणि सकारात्मक व्यक्तीमत्व असलेल्या मनिषला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे कॅप्शन देत त्याने हा फोटो पोस्ट केला होता. करणशिवाय बी- टाऊनमध्ये मनिष मल्होत्राचे बरेच मित्र असून, त्यांनीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेत्री रवीना टंडन आणि मनिषमध्येही घट्ट मैत्री आहे. ती मनिषला केवळ मित्रच नाही तर भाऊही मानते.