दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून नागार्जुन अक्किनेनी ओळखला जातो. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही त्याचे लाखो चाहते असल्याचे पाहायला मिळते. २९ ऑगस्ट रोजी नागार्जुनने त्याचा ६२वा वाढदिवस साजरा केला. त्याने कुटुंबीयांसोबतच वाढदिवस साजरा केला. दरम्यान, नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्यची पत्नी अभिनेत्री समांथा अक्किनेनी तेथे उपस्थित नसल्याचे दिसत आहे. तिच्या अनुपस्थितीने नागा चैतन्य आणि समांथा यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

नागार्जुनची पती आमलाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पतीचा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नागार्जुन, नागा चैतन्य, अखिल आणि चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तेथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत त्यांनी, ‘माय लव्ह, तुला चांगले आरोग्य, आनंद, समाधान मिळो. वाढदिवशी विशेष शुभेच्छा. देवाच्या आशिर्वादाने मी तुझ्यासोबत आहे. सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य घेणार घटस्फोट? समांथा म्हणाली…

 

View this post on Instagram

 

A post shared by Harsh Dixit (@chefharsh)

काही दिवसांपूर्वी समांथाने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अडनाव काढल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच समांथा आणि नागा चैतन्य वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. आता समांथा सासऱ्याच्या वाढदिवसाला देखील अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे.