इरफान पठाण आणि युसूफ पठाण ही जोडगोळी काही महिन्यांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. या जोडगोळीसोबत त्यांचे बाबा मेहमूद खान पठाण यांनीही हजेरी लावली होती. क्रिकेटमधून वेळ काढून या भावांनी प्रेक्षकांचं थोडं मनोरंजनही केलं. पठाण बंधूंना सध्या भारतीय क्रिकेट संघात स्थान नसले तरी ते लवकरच संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा करत आहेत.

आपल्या पालकांची लाज काढणाऱ्या तरुणाला अमिताभ यांनी सुनावले

शोमध्ये आल्यानंतर इरफानने त्याचे खासगी तसेच सार्वजनिक आयुष्यावर भाष्य केलं. मजा मस्तीमध्ये हे चित्रीकरण संपले. यावेळी युसुफनेही त्याच्या कुटुंबियांची आणि इतर खेळाडूंची गुपितं सांगितली. पठाण बंधूंनीनंतर ट्विटरच्या माध्यमातून पाच मित्रांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी होण्यासाठी मदत केली. दिल्लीस्थित इरफानच्या एका चाहत्याने ट्विटरवरुन मदत मागितली. तो पहिल्यांदाच मुंबईत त्याच्या मित्रांसोबत आला होता. त्यात एक अपंग मित्र होता. त्या मित्राला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे होते.

इरफानला हे कळल्यानंतर त्याने ‘द कपिल शर्मा शो’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या टीमने त्वरित त्या मित्रांना त्यांची नावं विचारुन प्रेक्षकांमध्ये बसण्याची सोय केली. ही एक छोटीशी गोष्टही त्यांना खूप काही देऊन गेली आणि इरफानने पुन्हा एकदा त्याच्यातल्या चांगुलपणाचा परिचय साऱ्यांना करुन दिला.

‘द कपिल शर्मा शो’मधील सुमोना व्यसनाधीन?

इरफान सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. हा अष्टपैलू खेळाडू शेवटचा दक्षिण आफ्रिकेविरोधात टी-२० सामना खेळला होता. सध्या तो भारतीय संघात येण्याचा प्रयत्न करत असताना त्याला इतर तरुण खेळाडूंसोबत तीव्र स्पर्धा करावी लागणार आहे. युसुफ पठाणसाठीही परतीचा मार्ग कठीण असला तरी अशक्य नक्कीच नाही.