भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्काने इटलीत गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. विरुष्कानंतर आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री अशाच प्रकारे विवाहबंधनात अडकल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ही अभिनेत्री आहे इलियाना डिक्रूझ. ख्रिसमसच्या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोला दिलेले कॅप्शन सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मॉडेलिंग विश्वातून अभिनय क्षेत्राकडे वळलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या खासगी आणि व्यवहारी जीवनाविषयी बऱ्याच गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. अगदी ऑस्ट्रेलिअन प्रियकर अॅंड्र्यू नीबोनसोबतच्या नात्याबद्दलही तिने काही लपवून ठेवले नाही. सोशल मीडियावर ती पोस्ट करत असलेले बरेचसे फोटो अँड्र्यूने काढलेले असतात हे त्यांच्या कॅप्शनवरूनच समजते. अॅंड्र्यू स्वत: एक प्रशिक्षित छायाचित्रकार आहे. इलियानाने नुकताच ख्रिसमस ट्री सजवतानाचा तिचा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोचे सौजन्य देताना तिने अँड्र्यूचा उल्लेख पती (photo by hubby) असा केला आहे. त्यामुळेच इलियानाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल होत असून अनुष्कानंतर इलियानानेही गुपचूप लग्न केले की काय, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

https://www.instagram.com/p/BdCzeCUDtir/

https://www.instagram.com/p/BZTfcLmDsNH/

अॅंड्र्यू हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा राहणारा असून, तो व्यवसायाने फोटोग्राफर आहे. बॉलिवूड पार्ट्यांमध्येही इलियानासोबत अँड्र्यूला अनेकदा पाहिले गेले.

https://www.instagram.com/p/BZOONYnj4jE/