‘बाहुबली २- द कन्क्लुजन’ चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता प्रभासला हिंदी चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते बरेच उत्सुक आहेत. प्रभास यशाच्या शिखरावर असतानाही कोणताच बॉलिवूड निर्माता किंवा दिग्दर्शक त्याला आपल्या चित्रपटात का घेत नाहीये, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. दरम्यान, ‘बाहुबली’च्या हिंदी व्हर्जनचे वितरण करणारा निर्माता करण जोहर हा प्रभासला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या चर्चाही मध्यंतरी सुरु होत्या. मात्र, आता करणही त्याला आपल्या चित्रपटात घेणार नसल्याचे कळते.

वाचा : मायावती यांना जादूची झप्पी देईन; संजूबाबाला न्यायालयाचा समन्स

प्रभासने ‘बाहुबली’ सीरिजमध्ये काम केल्यानंतर स्वत:च्या मानधनामध्ये बरीच वाढ केली आहे. ‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभासने बॉलिवूड पदार्पणातील चित्रपटाकरिता तब्बल २० कोटी रुपये मानधन मागितल्याचे कळते. प्रभासला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी उत्सुक असलेल्या करणला ही बाब फारशी रुचलेली नाही. प्रभासने मागितलेले मानधन ऐकून करणची बोलतीच बंद झाली.

Faster Fene Movie Review वाचा : ‘फेणे’ला पाहताना आप्पाच्या प्रेमात पडाल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभासने अव्वाच्या सव्वा मानधन मागितले आहे. तेलगू चित्रपटसृष्टीतील प्रभासची प्रसिद्धी पाहता त्याने तेथे २० कोटी रुपये मानधन मागणे योग्य आहे. पण, बॉलिवूडमध्येही त्याने तितकेच मानधन मागणे अवाजवी आहे. कोणत्याच दाक्षिणात्य कलाकाराला हिंदी चित्रपटसृष्टीत इतके मानधन दिले जात नाहीत. ‘बाहुबली’च्या यशानंतर करण त्याला लाँच करण्यासाठी उत्सुक होता. पण, त्याने मागितलेले मानधन पाहता आता त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासंबंधी करणचे मतपरिवर्तन झाले आहे.